मुंबई : सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल हे सांगता येणार नाही. अतिशय विस्तीर्ण अशा या सोशल मीडियाच्या वर्तुळात दर दिवशी असंख्य फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातच आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ काहीही संदर्भ ठाऊक नसणाऱ्यांमध्येही कमाल गाजत आहे. (Singer Robbie Williams to wear wifes bra on stage because of bizarre reason)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निमित्त ठरतंय ते म्हणजे इथं दिसणारं सेलिब्रिटी जोडी. लोकप्रिय गायक Robbie Williams आणि त्याची पत्नी Ayda Field यांनी नुकतंच एक इन्स्टा लाईव्ह केलं. 


लाईव्हमध्ये Ayda Field काही कपड्यांबद्दल माहिती देताना दिसली. यामध्ये एका क्षणाला तिनं Bra ची माहिती देण्यास सुरुवात केली. कापड, शिवण, पद्धत या साऱ्याचीच माहिती तिनं दिली आणि मग, तेव्हाच तिच्या पतीनं जे केलं ते पाहून सर्वच हैराण झाले. 


कारण Ayda Fieldच्या पतीनं म्हणजेच गायक रॉबी विलियम यानं तिच्या हातात असणारे ते अंडरगार्मेंट घातले आणि सर्वांचेच डोळे तिथं स्थिरावले. 


Ayda Field नं केलेलं हे लाईव्ह प्रचंड व्हायरल झालं. त्याच्यावर असंख्य कमेंट्स आणि रिअॅक्शन्सही आले. 



जिथं काही गोष्टींचा न्यूनगंड पाळत त्या गोष्टींबद्दल बोलणंही टाळलं जातं. तिथेच ही सेलिब्रिटी मंडळी अगदी सहजपणे काही चौकटी मोडताना दिसत आहेत. कारण काहीही असो, पण त्यांच्या या मानसिकतेची प्रशंसा केलीच पाहिजे.