`फेस वॉश करायला विसरली?`, वेडिंग रिसेप्शनला मेकअपशिवाय आलेली प्रसिद्ध गायिका ट्रोल
Sunidhi Chauhan Dull Face: मेकअपशिवाय कोण्या ग्लॅमरस अभिनेत्रीला, गायिकेला पाहिल्यावर त्यांच्यापेक्षा (Actresses Without Makeup) आपल्यालाच काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. त्यातून सध्या लोकप्रिय आणि ग्लॅमरस गायिका सुनिधी चौहान हिच्या नो मेकअप (No Makeup Look) लुकनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. परंतु तिचा फिका पडलेला चेहरा आणि थकलेले डोके पाहून पात्र चाहत्यांना काळजीही वाटू लागली आहे.
Sunidhi Chauhan Dull Face: बॉलिवूडचे विश्व हे अत्यंत ग्लॅमरस आहे. येथे मेकअपशिवाय काहीच पुर्ण होत नाही. मेकअपशिवाय कोणी अभिनेत्री दिसली तर साहजिकच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात. आपल्याला या सेलिब्रेटींना मेकअपमध्ये पाहण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांनी चेहऱ्यावरून जरा मेकअप बाजूला केला तर त्यांच्यापेक्षा आपल्यालाच चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागते. लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान हिचा नो मेकअप लुकचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे परंतु तिचा बदललेला चेहरा पाहून चाहत्यांना अक्षरक्ष: धक्का बसलाय. नक्की तिला झालंय तरी काय असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.
रणदीप हुडाच्या लग्नाची सध्या बरीच चर्चा होती. नुकत्याच त्याच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडचं अख्खं तारांगण उपस्थित होते. यावेळी गायिका सुनिधी चौहानंही उपस्थिती दर्शवली होती. यंदा सगळ्यांचेच लक्ष तिच्या चेहऱ्याकडे वळले होते. आपल्या प्रत्येक कॉन्सर्टसाठी, इतरत्र कार्यक्रमांसाठी आवर्जून नटून थटून हजर राहणारी ही गायिका यावेळी अशी फिकी का बरं आली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुळात ग्लॅमरस असणाऱ्या सुनिधी चौहानला नक्की झालंय तरी काय? असाही प्रश्न तिच्या नेटकऱ्यांना किंबहूना तिच्या चाहत्यांना पडल्यावाचून राहिला नाहीये.
अभिनेता रणदीप हुडा यानं वयाच्या 47 वर्षी मणिपूरच्या मॉडेल आणि अभिनेत्री लिन लॅशरामशी लग्न केले. 29 नोव्हेंबर रोजी त्यांना विवाह संपन्न झाला. अभिनेत्री आणि मॉडेलिंगशिवाय लिन ही एक बिझनेसवूमनही आहे. 11 डिसेंबर रोजी मुंबईत त्यांचे ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन होते. यावेळी बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय चेहेरे यावेळी उपस्थित होते. उपस्थित सुनिधी चौहानचा लुक पाहून मात्र चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी तिनं काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. मेकअप तर तिनं अजिबातच केलेला नव्हता. केस मोकळे सोडले होते. दागिनेही फारसे न घातला तिनं कानातले घातले होते. तिचा हा साधा लुक अनेकांना आवडला. आपल्या गोड हास्यानंही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
हेही वाचा : पंचक सुटणार, रहस्य उलगडणार?; पाहा मल्टिस्टारर Panchak चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर...
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
यावेळी तिचा हा लुक पाहून नेटकरी तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, 'आपल्या वयापेक्षा जास्त म्हातारी दिसते आहे.' तर एकानं लिहिलंय की, 'बिचारीचा चेहरा का इतका सुजला आहे?' अनेकजण तिचा हा लुक पाहून काळजीतही पडले आहेत. एका युझरनं लिहिलंय की, 'हिला काय झालंय? फेस वॉश लावायला विसरलीये वाटतं.'
सुनिधी चौहान ही बॉलिवूडची लोकप्रिय गायिका आहे. 18 व्या वर्षी तिनं बॉबी खानशी लग्न केले होते. त्यानंतर वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिनं हितेश सोनिकशी लग्न केले. तो एक म्युझिक कंपोझर आहे. त्यांना एक मुलगाही आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते दोघं एकत्र आहेत.