मुंबई : आपल्या गायनाने सर्वांनाच भुरळ पाडणारे सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकरांचा गौरव करण्यात आला आहे. वाडकरांना भारत सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. या घोषणेनंतर सर्वच स्तरावरून वाडकरांच कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकार कडून देण्यात येणारा पद्म पुरस्कार श्रेणीतील तिसरा सर्वोच्च 'पद्मश्री पुरस्कार' जाहीर झाला आहे. सुरेश वाडकरांनी आतापर्यंत मराठी तसेच हिंदीत शेकडो गाणी गायली आहेत. 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकरांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव केला होता. 2011 मध्ये सुरेश वाडकरांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.



सुरेश वाडेकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापुरात झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचं शिक्षण सुरु केलं. सुरेश वाडेकर यांचा विवाह 1988 मध्ये पद्मा यांच्याशी झाला. पद्मा वाडकरही प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत.