आई झाल्यानंतर पहिल्यांदाच `या` चित्रपटात दिसणार दीपिका, सोबत असणार रणवीर सिंह
`सिंघम 3` चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोण देखील येणार आहे.
Singham Again Trailer: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह सप्टेंबर महिन्यात आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर दोघेही मुलीची काळजी घेताना दिसत आहेत. मुलीची काळजी स्वत: दीपिका पदुकोण घेणार असून तिने आता अभिनयापासून ब्रेक घेतला आहे.
दरम्यान, मुलीच्या जन्मानंतर प्रथमच दीपिका पदुकोण प्रेक्षकांसमोर येणार आहे. दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट 'सिंघम 3' चा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या ट्रेलर रिलीज सोहळ्याला दीपिका उपस्थित राहणार आहे.
'सिंघम 3' चा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पत्रकार आणि सर्व सेलिब्रिटी तसेच 2 हजार चाहते देखील येणा आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे चाहते सध्या दीपिका पदुकोणच्या या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.
या ठिकाणी लॉन्च होणार 'सिंघम 3' चा सोहळा
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'सिंघम 3'चा ट्रेलर 7 ऑक्टोबरला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे पार पडणार आहे. यामध्ये पत्रकार देखील उपस्थित असणार आहेत. त्यासोबतच अक्षय कुमार, अजय देवगन, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, करीना कपूर यांच्यासह इतर सर्व कलाकार देखील उपस्थित असणार आहेत. तसेच या सर्व कलाकारांचे चाहते देखील उपस्थित असणार आहेत.
'सिंघम 3' चा ट्रेलर लॉन्च सोहळा हा या वर्षातील सर्वात मोठा सोहळा मानला जात आहे. जर या सोहळ्यासाठी दीपिका पदुकोण येणार असेल तर चाहत्यांसाठी हा सोहळ्या खूप खास ठरणार आहे.
'सिंघम 3' या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार
या चित्रपटातील सर्व कलाकार या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण हिने एका मुलीला जन्म दिला आहे. या चित्रपटात तिने काम केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा आहे की, दीपिका पदुकोण या सोहळ्यासाठी उपस्थित राहील. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह देखील एका पार्टीमध्ये दिसला होता.
'सिंघम 3' या चित्रपटात अजय देवगन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टाइगर श्रॉफ, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.