Mumbai : आजही स्मिता पाटील अनेकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाने राज्य करत आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी इतकं काही साध्य केलं होतं, जे आयुष्यभर जगूनही अनेक कलाकार मिळवू शकत नाहीत. स्मिता पाटील यांना प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी तिला 'चरणदास चोर' चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले होते. (smita patil before working in the film industry news anchor on durdarshan bollywood nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


स्मिता पाटील या केवळ एक अप्रतिम अभिनेत्रीच नव्हत्या तर एक सक्रिय स्त्रीवादी कार्यकर्ती देखील होत्या. महिलांचे प्रश्न ठळकपणे मांडणाऱ्या स्मिता यांनी केवळ अशाच चित्रपटांमध्ये काम करणे पसंत केले जे रुपेरी पडद्यावर सामाजिक बदलाला सामोरे जाणाऱ्या महिलांची स्वप्ने साकार करू शकतील. 'भूमिका', 'मंडी', 'मंथन', 'अर्थ', 'आखिर क्यूं', 'आज की आवाज', 'चक्र', 'मिर्च मसाला' यांसारख्या चित्रपटांतील स्मिता पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. अवघ्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत स्मिता यांनी सिनेविश्वाला अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले. 


हे ही वाचा - ''मी उंच नाही, पण.. स्वतःच्या बॉडी पार्टबाबत अभिनेत्रीचं अतिशय बोल्ड वक्तव्य...



स्मिता पाटील  या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याआधी दूरदर्शनवर न्यूज रीडर म्हणून कार्यरत होत्या. दूरदर्शनवरील बातम्या वाचतानाच त्यांनी पहिल्यांदाच कॅमेराचा सामना केला होता. त्यादरम्यानचा एक मजेदार किस्सा आहे. 



जीन्सवर साडी गुंडाळून बातम्या वाचायच्या


स्मिता पाटील या बॉम्बे दूरदर्शनवर बातम्या वाचायच्या. दूरदर्शनवरील बातम्या वाचण्यासाठी साडी नेसणे आवश्यक होते आणि स्मिता पाटील यांना जीन्स घालणे आवडत असे. त्यावेळी स्मिता पाटील या फक्त जीन्स घालायच्या आणि साडी नेसायला त्यांना आरामदायक वाटत नसे. मात्र, यावरही त्यांनी उत्तम उपाय शोधला होता. बर्‍याचदा स्मिता पाटील या जीन्स घालून स्टुडिओत पोहोचायच्या पण त्यावर साडी नेसून त्या खूप गंभीर वृत्तीने बातम्या वाचायला सुरुवात करायच्या.


हे ही वाचा - अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी



स्मिता पाटील यांचा जन्म 


पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी एका राजकारण्याच्या घरी झाला. स्मिताचे वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांची आई समाजसेविका होती. स्मिता पाटील या हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. स्मिता पाटील यांनी स्त्री मुख्य भूमिका साकारणाऱ्या नायिकांसाठी एक नवा मार्ग सुरू केला. स्मिता पाटील यांनी हिंदीसोबतच बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. 


हे ही वाचा - SRK Vs Salman Vs Aamir: संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडमधला कोणता खान नंबर वन, जाणून घ्या



स्मिता पाटील यांनी अवघ्या ३१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला


'भीगीन पालके' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची राज बब्बरशी भेट झाली. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रेमाचे चिन्ह प्रतीक बब्बर हा मुलगा आहे, प्रसुतीदरम्यान अपघात झाल्यामुळे स्मिता पाटील यांनी अवघ्या ३१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.