मुंबई : अभिनेत्री ते नेता असा प्रवास असलेल्या मंत्री स्मृति ईराणी यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज २३ मार्च रोजी स्मृती आपला वाढदिवस साजरा करित आहेत. ग्लॅमरस इंण्डस्ट्री सोडून स्मृती यांनी राजकीय क्षेत्रात उडी मारली. या दोन्ही क्षेत्रात स्मृती यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली. आज आम्ही तुम्हाला स्मृतीजींचे असे काही थ्रोबॅक व्हिडीओ दाखवणार आहोत ज्यात तुम्हाला त्यांना ओळखणं कठीण होवून जाईल.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मृती ईराणी यांनी २१व्या वर्षी 'फेमिना मिस इंडिया' (1998) मध्ये सहभाग घेतला होता. या थ्रोबॅक व्हिडीओमध्ये स्मृती आत्मविश्वासासहित वॉक करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये स्मृती बोलताना दिसत आहेत की, त्या इंग्लिश लिटरेचर डिग्री करत आहेत.


तसंच स्पोर्ट्स एडवेंर्चसमध्ये देखील त्या सहभागी होतात. याचबरोबर त्या राजकारणात कार्यरत होत्या. करिअरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच स्मृती यांचा राजकारणाकडे त्यांचा कल होता.


ब्युटी कटेंस्टमध्ये सहभागी झाल्यानंतर स्मृती यांनी एक्टिंगच्या दुनियेत पहिलं पाऊल टाकलं. सीरियल्समध्ये येण्याआधी सिंगर मिका सिंह याच्या म्युझिक अल्बम व्हिडीओ 'बोलियां' मध्ये त्या दिसल्या होत्या. त्यांनी या व्हिडीओमध्ये गोल्डन आऊटफिट परिधान केलं होतं.


आताच्या फोटो आणि व्हिडीओच्या तुलनेत स्मृती यांचे जुने फोटो व्हिडींओमध्ये बराच फरक पहायला मिळतो. जुन्या फोटोजमध्ये स्मृति ईराणी ओळखणं फारच कठीण दिसतंय.


स्मृती यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत 'तुलसी विलानी' या दमदार भूमिकेत दिसल्या होत्या. बरीच वर्ष लोकं त्यांना 'तुलसी' या नावाने ओळखत होते. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेसाठी त्यांना ५ इंडियन टेलीव्हिजन एकेडमी अवॉर्ड, ४ टेली अवॉर्ड आणि ८ स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्सनं सन्मानित करण्यात आलं होतं.