स्नेहल तरडे पती प्रविण तरडेवर नाराज; कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल
प्रविण तरडेच्या धर्मवीर ते मुळशी पॅटर्न असे अनेक सिनेमांना रसिंकानी डोक्यावर घेतलं. सध्या अभिनेत्याचे बरेच सिनेमा पाइपलाईनमध्ये आहेत. त्यामध्ये चौक, `वेडात मराठे वीर दौडले सात`, बलोच असे अनेक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मुंबई : 'आरा रा रा खतरनाक...' म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे हे नाव. मनोरंजन क्षेत्रातलं हे खूप मोठं नावं आहे. आत्तापर्यंत अभिनेत्याने बरेच सिनेमा केले आहेत. जेवढे प्रोजेक्ट अभिनेत्याने केले त्यापैकी बऱ्यापैकी सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यवर घेतले आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. प्रविण तरडे जेवढा उत्कृष्ट अभिनेता आहे तेवढ्याच ताकदीचा तो लेखक आणि दिग्दर्शक आहे. अभिनेत्याचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाइपलाईनमध्ये आहेत.
धर्मवीर ते मुळशी पॅटर्न असे अनेक सिनेमांना रसिंकानी डोक्यावर घेतलं. सध्या अभिनेत्याचे बरेच सिनेमा पाइपलाईनमध्ये आहेत. त्यामध्ये चौक, 'वेडात मराठे वीर दौडले सात', बलोच असे अनेक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रविण तरडे यांचा 'बलोच' हा मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट येत आहे. सध्या या सिनेमाचा टीझर असो की गाणी प्रेक्षकांनी याला प्रचंड प्रेम दिलं आहे.
'आस खुळी' हे या सिनेमातील काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालं. जे रिलीज होताच चर्चेत आलं. सोशल मीडियावर 'आस खुळी' या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. काही प्रेक्षकांनी या गाण्याला प्रचंड पसंती दिली आहे तर काहींनी मात्र या गाण्याला प्रचंड ट्रोल केलं आहे. प्रविण तरडे यांनी आत्तापर्यंत रांगड्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमातही त्यांची अशीच भूमिका आहे. पण पहिल्यांदाच ते या सिनेमात आपल्याला रोमँन्टिक अंदाजात दिसले आहेत. या गाण्यात प्रवीण तरडे पहिल्यांदाच रोमॅंटिक अंदाजात पाहून चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
खंरतर याचबरोबर प्रविण तरडेची पत्नी स्नेहल तरडेनेही हे गाण पाहून नाराजी व्यक्त केली आहे आणि याचा खुलासा स्वत: प्रविण तरडे यांनी एका मुलाखती दरम्यान केला आहे. मुलाखतीमध्ये बोलताना प्रविण म्हणाला की, ''मला जेव्हा सिनेमात रोमँन्टिक रोल करायची आहे असं सांगितलं तेव्हा मीच खूप सरप्राईज होतो. मुळात माझ्यात रोमँन्टिकपणा कुठेच नाही.
मात्र माझं हे गाणं रिलीज होताच माझ्या बायकोला मात्र खूप मोठा धक्का बसला. ती मला म्हणाली मी हे गाणं पाहूचं शकतं नाही. स्नेहलने हे गाणं पुर्ण पाहिलंच नाही. मी तिला समजावलं आणि सांगितलं, की तु देखील एक अभिनेत्री आहेस. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुला माहिती असणं खूप गरजेचं आहे. हा एक चित्रपट आहे. त्यावर स्नेहल म्हणाली, 'हंबीरराव चित्रपटात मी तुझी नायिका होते. तेव्हा तू असं रोमँटिक गाणं का केलं नाही?'' पुढे ते म्हणाले, 'आता 'मी तिला कसंबसं समजावलं आहे. मात्र तरिही तिचा राग मात्र अद्याप गेलेला नाही. ते गाणं फार सुंदर झालं आहे. पण माझी बायको सोडून ते संपूर्ण जगाने पाहिलंय.' मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या 'बलोच' सिनेमा येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.