मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आयरा अभिनेत्री नसली तरी तिच्या सोशल पोस्ट आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. त्यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे. हा व्हिडीओ खुद्द नुरूपने शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये नुपूर काऊचवर बसला आहे. तो सोशल मीडियावर स्क्रोल करत आहे. तेव्हा आयरा आणि नुपूरच्या व्हिडीओवर एका युजरचा आलेला मेसेज तो वाचतो. सध्या आयरा आणि नुपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमध्ये एक युजर म्हणतो, 'आयरा माझं प्रेम आहे... तिला स्पर्ष देखील करू नको...' युजरचा मेसेज वाचून नुपूर जे करतो ते अत्यंत मजेशीर आहे. नुपूर काऊचवरून उठतो आणि आयराला स्पर्ष करतो. त्यानंतर नुपूरने आयराला किस केलं. 


सांगायचं झालं तर, एका फिटनेस सत्रादरम्यान नुपूर आणि आयराची ओळख झाली. नुपूर आयराचा फिटनेस कोच आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघांची भेट झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सतत होत असतात.