पदरात तीन मुलं असणारी अभिनेत्री प्यायली जोडीदाराचं रक्त; कारण ऐकून हडबडाल
पाहा रक्तरंजित प्रेम करणारी आणि जगासमोर
मुंबई : प्रेमात माणसांना वेड लागतं असं ऐकलं होतं, वाचलंही होतं. इतकंच काय, तर पाहिलंही होतं. पण, प्रेमात माणसं एकमेकांचं रक्तही पितात हे कधी ऐकलं किंवा पाहिलंय ? विश्वास बसणार नाही, पण असं खरच घडलं आहे. एका अतिशय लोकप्रिय सेलिब्रिटीनं त्यांच्या नात्याची एक वेगळी आणि शब्दश: रक्तरंजित बाजू जगासमोर आणली आहे.
आम्ही एकमेकांचं रक्त पितो, असं संपूर्ण जगाला छातीठोकपणे सांगणारी ही जोडी म्हणजे अभिनेत्री मेगन फॉक्स (Megan Fox) आणि मशीन गन केली (Machine Gun Kelly).
केलीसोबतच्या साखरपुड्याची झलक शेअर करत तिनं लिहिलं होतं, 'जुलै 2020 ला याच वृक्षाखाली आम्ही एकमेकांना भेटलो'. जवळपास दीड वर्षांच्या आनंददायी साथीनंतर त्यानं मला लग्नाची मागणी घातली आणि मी लगेचच होकार दिला, असंही तिनं सांगितलं.
आपण आणि आपल्या जोडीदारानं एकमेकांचं रक्त प्यायलं असल्याचंही तिनं स्पष्ट केलं. एका लोकप्रिय मासिकाला मुलाखत देताना तिनं रक्त पिण्यासंबंधीचा खुलासा केला.
'आम्ही एकमेकांचं रक्त प्यायलो आहोत असं जर मी म्हटलं, तर ते ऐकायला बरं वाटणार नाही. नाहीतर लोकं आम्ही वाटीतून रक्त पितो, जसं गेम ऑफ थ्रोन्समध्ये केलं होतं अशी कल्पना लोकं करतील', असं म्हणत आम्ही फक्त एकमेकांचं काही थेंब रक्त प्यायलो आहोत असं ती म्हणाली.
काही विधींचा भाग म्हणून आपण असं केल्याचंही मेगननं सांगितलं. आपला स्वभाव अतिशय नियंत्रित असल्याचं सांगत, मी टॅरो कार्ड रिडिंग करते, फूल मून-न्यू मून अशा विधींवरही माझा विश्वास आहे. मी हे जे करते त्याच्यामागे काही कारणं असतात असं म्हणत एकदा एकमेकांतं रक्त प्यायचा निर्णय घेतल्याचा उलगडा तिनं केला. मशीन, अतिशय अस्थिर असल्याचं सांगत त्यानं लगेचच तुटलेला ग्लास घेतला, छातीवर चिर मारली आणि म्हणाला 'घे माझं हृदय घे'.... अशा शब्दांत मेगनननं तो प्रसंग सांगितला.
दरम्यान, मेगन आणि मशीनची ही रक्तपिपासू केमिस्ट्री सध्या सर्वांनाच धक्का देत आहे. हे मेगनचं दुसरं लग्न असेल. यापूर्वीही ती विवाहबंधनात अडकली होती. मेगन तीन मुलांची आईसुद्धा आहे. अभिनेता ब्रायन ऑस्टिन ग्रीन याच्याशी तिनं लग्न केलं होतं. तर, केलीलासुद्धा यााधीच्या नात्यातून एक मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे.