मुंबई : बॉलिवूडच्या या झगमगत्या दुनियेत  असे अनेक सत्य आहेत, जे अद्याप त्यांच्या चाहत्यांना माहिती नाहीत. बॉलिवूड स्टार कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्तेत असतात. कधी चित्रपटांमुळे कधी अफेअर्समुळे तर कधी मैत्री आणि शत्रूत्वामुळे.  आपल्या सुंदर अदांनी चाहत्यांना घायाळ करणरी अभिनेत्री करीना कपूर खानचे देखील शत्रू आहेत. असे काही स्टार्स आहेत, ज्यांच्यासोबत करीनाचा 36चा आकडा आहे. अभिनेत्री करीना कपूर खानच्या शत्रूंची यादी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता बॉबी देओल 




'जब वी मेट' चित्रपट अभिनेता शाहीद कपूर आधी अभिनेता बॉबी देओलला ऑफर करण्यात आला. पण करीनाच्या सांगण्यावरून त्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर बॉबी आणि करीना कधीही एकमेकांच्या समोर आले नाहीत. 


अभिनेत्री दीपिका पादूकोण




इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या वर्चस्वावर स्थान पक्कं करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि करीनामध्ये 36चा आकडा आहे. दोघी कधीचं एकमेकींसोबत बोलत नाहीत. 


अभिनेता शाहीद कपूर 




ब्रेकअपनंतर शाहीद आणि करीनाने 'उडता पंजाब' चित्रपटात एकत्र काम केलं. पण त्यानंतर दोघे कायम दूर राहीले. आजही त्यांच्यामध्ये दूरावा आहे. 


अभिनेत्री दिया मिर्झा




एका कार्यक्रमा दरम्यान दियाने करीनाच्या ड्रेसवर वाईट कमेन्ट केलं. ज्यानंतर बेबो भयंकर भडकली होती. करीना कपूरने स्पष्टपणे सांगितले होते की दियाला तिच्या स्टाईलवर भाष्य करण्याचा अधिकार नाही.


अभिनेता ऋतिक रोशन 




करीनाने हृतिकसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. करीना आणि हृतिकच्या लिंकअपच्या बातम्या समोर येत असताना बेबोला मोठा धक्का बसला. करीनाने तेव्हा शपथ घेतली होती की ती पुन्हा हृतिकसोबत काम करणार नाही.


बिपाशा बासु 




करीना कपूर खान आणि बिपाशा बसू यांच्यातील कॅटफाईबद्दल संपूर्ण इंडस्ट्रीला जाणीव आहे. बिपाशाचा पहिला चित्रपट अजनबी'मध्ये करीना होती. तेव्हा दोघींमध्ये वाद झाले. त्यावेळी करीनाने बिपाशाला 'काली बिल्ली' म्हणून हाक मारली.