`कुणाचे प्रायव्हेट पार्ट...`, बर्लिनमधील पार्टीत पोहोचली बॉलिवूड अभिनेत्री; ते दृश्यं पाहून गायत्री मंत्राचा...
Suchitra Krishnamoorthi : 90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने खुलासा केलाय की, जेव्हा ती बर्लिनमधील त्या विचित्र पार्टीत गेली होती, जिथे कोणीही कपडे घातले नव्हते, हे दृश्यं पाहून...
Suchitra Krishnamoorthi : 90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिची खास ओळख झाली शाहरुख खानसोबतच्या 'कभी हान कभी ना' या चित्रपटातून तिला मिळाली. या चित्रपटानंतर ती रातोरात प्रसिद्धी झाली. अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका विचित्र पार्टीबद्दल मोठा खुलासा केलाय. त्या पार्टीत तिला काहीतरी चांगला अनुभव मिळेल या विचाराने गेली होती. पण तिथले दृष्य पाहून तिने तिथून पळ काढला.
'कुणाचे प्रायव्हेट पार्ट...'
सुचित्रा कृष्णमूर्तीने X (Twitter) वर एक पोस्ट शेअर करत त्या पार्टीबद्दलचा अनुभव सांगितला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'बर्लिनमध्ये बॉडी पॉझिटिव्ह/नेकेड पार्टीमध्ये सहभागी व्हा. इतकं मोकळं होऊ नकोस की तुमचा मेंदू बाहेर पडेल ही म्हण आठवली. मी नेहमीच देसी मुलगी राहीन. आंघोळ करून गायत्री मंत्राचा जप करावा असं वाटतं. अरे देवा.' अभिनेत्रीने सांगितले की ती एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या पार्टीला गेली होती. शरीर सकारात्मकता वाढवणे आणि शरीराची चिंता दूर करणे हा त्यांचा उद्देश होता, म्हणून ती या पार्टीला गेली होती.
सुचित्रा कृष्णमूर्ती पुढे म्हणाली की, आता काही तरी नवीन अनुभव घेऊयात. ती या पार्टीसाठी उत्साहित होती आणि तिथे गेली पण पोहोचल्यानंतर तिला काहीच दिसेना. बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितले की एका बारमध्ये पार्टी सुरू होती, जी तिच्या मित्राच्या मित्राची होती. त्याचाही त्या पाहुण्यांच्या यादीत नाव होतं. सुचित्रा म्हणाली की ती तिथे गेली पण आतमध्ये पोहोचताच तिथले दृश्य पाहून तिला धक्काच बसला आणि तिने तिथून लगेच पळ काढला. कारण ती देसी गर्ल आहे असा तिचा विश्वास आहे. तिला कोणाचेही प्रायव्हेट पार्ट बघायचे नव्हते.
त्या 20 मिनिटांमध्ये...
एवढंच नाही तर सुचित्रा कृष्णमूर्ती पुढे म्हणाली की, न्यूड पार्टीमागे चांगले हेतू आहेत. ते मजेदार आणि सकारात्मक गोष्टींसाठी होते. त्यात काही अजिबात अश्लील नव्हतं. पण भारतीय म्हणून आपण आपल्या शरीराविषयी जागरूक राहून मोठे झालो आहोत, असा त्याचा विश्वास आहे. या पार्टींमध्ये गोष्टी हाताळायला आणि लपवायला शिकवले जातात. साधारण 20 मिनिटं ते अर्धा तास ती या पार्टीत होती. ही पार्टी रात्रभर सुरू होती. इथे फक्त निमंत्रणावर केले पाहुणे होते. सुचित्रा शेवटी म्हणाली की तिला खूप मजा आली पण ती एक देसी गर्ल आहे.