मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा हिच्या खासगी आयुष्यात आलेली वळणं कायमच चर्चेचा विषय राहिली आहेत. खान कुटुंबाशी असणारं तिचं नातं, अरबाजशी लग्न आणि त्यानंतर घेतलेला घटस्फोट हे तिला चर्चेत आणणारे काही विषय. (Malaika Arora)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे मलायकाचा फिटनेस फंडा लक्ष वेधत असतो. तर, दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात तिनं घेतलेले निर्णय. 


अभिनेता, निर्माता- दिग्दर्शक अरबाज खान याच्यापासून मलायका विभक्त झाली. अरबाज आणि तिचा घटस्फोट झाला. 


पुढे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमाला बहर आला. सध्या ही जोडी जाहीरपणे एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत असते. 


मलायकाच्या घटस्फोटानंतरही मुलासाठी अरबाज आणि ती काही प्रसंगी एकमेकांसमोर आले. 


आपल्या मुलाची म्हणजेच अरहानची घटस्फोटानंतर नेमकी काय प्रतिक्रिया होती, याचा उलगडा मलायकानं एका मुलाखतीत केला होता. 


'मी माझ्या मुलाला एका अशा वातावरणात पाहू इच्छित होते जे आनंदी असेल, जिथं तणाव नसेल. तिथं भांडण - तंटे नसतील', असं मलायका म्हणाली. 


तिच्या मते, अरहान म्हणजेच तिच्या मुलाला आपले आई-वडील एकत्र राहण्याऐवजी ते विभक्त राहून आनंदी आहेत ही बाब लक्षात आली होती. 


ते वेगळे असतात तेव्हा एक व्यक्ती म्हणूनही फार चांगले आणि आनंदी असतात याची अरहानला जाणीव होती. ज्यामुळं घटस्फोटानंतरची त्याची प्रतिक्रिया मलायकाला मोठा दिलासा देणारी होती. 


काय म्हणालेला अरहान? 
घटस्फोटानंतर अरहान मलायकाला म्हणाला होता, 'आई, तुला असं आनंदात आणि हसतमुख पाहून मला फार बरं वाटतंय.'


लहान वयात अरहानला आलेली समज आणि त्याचे हे उदगार मलायकासाठी मोठा आधार होते. कारण याचा तिनंही विचार केला नव्हता. 


अरहान सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहे. घटस्फोटानंतर मलायकाकडेच त्याचा ताबा राहिला आहे. तर, अरबात जॉर्जिया आंद्रियानी नावाच्या एका इटालियन मॉडेलला डेट करत आहे.