`अनेकांना छेडणाऱ्या अनू मलिकसारख्या...`; कंगनाच्या कानशीलात लगावणारीच्या मदतीस निघालेल्या विशाल ददलानीला गायिकेनं सुनावलं
Sona Mohapatra Slams Vishal Dadlani Over Kangana Ranaut Incident : लोकप्रिय गायिका सोना मोहपात्रानं विशाल ददलानीला कंगना रणौत प्रकरणात सुनवले खडे बोल
Sona Mohapatra Slams Vishal Dadlani Over Kangana Ranaut Incident : चंडीगढ विमानतळावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतसोबत घडलेल्या घटनेनंतर बॉलिवूडचे दोन भाग झाले असं म्हणायला हरकत नाही. काहींनी कंगनाची साथ दिली तर काहींनी कुलविंदर कौरची साथ दिली. तर कुलविंदर कौरची साथ विशाल ददलानीनं दिली आहे. त्यांनी CISF महिला जवानला नोकरी देण्याचं वचन दिलं आहे. त्यावेळी म्हटलं की जर कॉस्टेबल विरोधात कोणती कारवाई केली तर तिला विशाल नोकरी देणार. आता विशालचं हे बोलणं गायिका सोना मोहपात्राच्या पसंतीस उतरलं नाही. तिनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर, जेव्हा गायक विशाल ददलानीनं कंगना रणौतनंला कानशिलात लगावण्याच्या प्रकरणावर एक पोस्ट केली. तेव्हा एका नेटकऱ्यानं त्याची स्तुती केली आणि कमेंट करत म्हणाला, 'लोकप्रिय गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीनं CISF ची अधिकारी कुलविंदर कौरला नोकरीची ऑफर दिली आहे. जिनं कंगना रणौतला तिचं स्थान दाखवलं. ती बॉलिवूडमधील अशा रत्नांपैकी एक आहे, ज्यांनी त्यांचं अस्तित्व हे गमावलं आहे. त्यांच्यासाठी ही सम्मानाची गोष्ट आहे.'
यावर सोना मोहपात्रानं प्रतिक्रिया देत विशाल ददलानीवर टीका करत सांगितलं की 'कथित पाठीचा कणा असलेली ही व्यक्ती परिक्षक म्हणून अन्नू मलिकसारख्या अनेक लोकांच्या बाजूला बसलेली असते,ज्यांनी अनेकदा महिलांची छेड काढली आहे. माझ्यासारखी सहकारी जेव्हा त्याला याविरुद्ध बोलायला सांगते, उभं राहायला सांगते, रिअॅलिटी शोमधील ही विषारी संस्कृती फेटाळून लावण्यास सांगते तेव्हा तो 'पैसे कमावायचे आणि देश सोडून निघायचे,' असं म्हणतो. एवढा उत्तम व्यक्ती आहे हा, मी काय सांगू', असा उपहासात्मक टोला तिने लगावला आहे.
हेही वाचा : कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा
कंगना रणौत ही हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर तिनं कॉंग्रेसचे मतदार विक्रमादित्य सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि विजय मिळवला आहे. पण जेव्हा ती मंडीवरून दिल्लीच्या दिशेनं जायला निघाली तेव्हा चंडीगढ विमानतळावर एका सीआयएसएफ महिला जवाननं तिला कानशिलात लगावली. असं म्हटलं की जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं तेव्हा तिनं खूप वाईट गोष्टी सांगितल्या. त्यामुळे त्याचा राग त्या महिलेला होता. या सगळ्या प्रकरणानंतर त्या महिलेला सस्पेंड करण्यात आलं आणि FIR देखील दाखल करण्यात आली.