मुंबई : बॉलिवूड स्टार कोणत्याही चांगल्या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी क्षणाचाही विलंब करत नाहीत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हा एका उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. ‘दबंग गर्ल’ सोनाक्षीने आलिया भट्टच्या 'मी वार्डरोब सू वार्डरोब' सहभाग घेतला आहे. यासाठी सोनाक्षीने तिच्या वार्डरोब मधील काही कपडे दान केले आहेत. वर्षाच्या सुरवातील आलियाने या अनोख्या उपक्रमाला सुरूवात केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाक्षीच्या वार्डरोबचे कपडे 'साल्टस्काउट डॉट कॉम'वर लिलाव आणि विक्रीसाठी २ जुलैपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. या उपक्रमात सहभागी होणारी सोनाक्षी दुसरी अभिनेत्री आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश बिइंग ह्युमन-द सलमान खान फाउंडेशनच्या माध्यमातून वंचीत घटकांपर्यंत शिक्षण आणि आरोग्य सेवेचे समर्थन करणे आहे.  


गरीबांच्या मदतीसाठी अभिनेत्री आलिया भट्टने 'मी वार्डरोब सु वार्डरोब' नावाचा एक उपक्रम आमलात आणला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून आलियाच्या चाहत्यांनी वार्डरोबमधील काही कपड्यांची खरेदी केली होती. 


उपक्रमाच्या पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या पैशांच्या माध्यमातून तिने कर्नाटकमधील ४० घरांना सौरऊर्जेच्या मदतीने प्रकाशमय केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून ती पर्यावरण आणि पशू संवर्धन अशा मुद्द्यांवर काम करणार आहे. त्याचप्रमाणे लोकांमध्ये पर्यावरणासंबंधीत जागृती निर्माण करण्याचे काम सुद्धा 'मी वार्डरोब सू वार्डरोब' उपक्रमाच्या माध्यमातून होणार आहे.