मुंबई | बॉलिवूड अभिनेता सलमान खान अभिनय क्षेत्रातील कित्येक प्रसिद्ध कलाकारांचा गॉड फादर म्हणून ओळखला जातो. दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासाठी देखील सलमानने बॉलिवूडचे दालन उपलब्ध करून दिले. 'दबंग' चित्रपटाच्या दमदार पदार्पणाच्या माध्यमातून तिने यशाच्या उच्च शिखरावर आपले नाव कोरले आहे. 'दबंग' चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या. सध्या ती 'दबंग' चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वलमध्ये व्यस्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या जून्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोनाक्षी एका फॅशन शोमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होती. त्या फॅशन शोमध्ये सलमान सुद्धा उपस्थित होता. तेव्हा त्याने सोनाक्षीला पाहिले आणि तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. कारण, तो सोनाक्षीला चित्रपटामध्ये कास्ट करू इच्छीत होता. 


'सलमानने मला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता, कारण सलमान मला चित्रपटामध्ये कास्ट करू इच्छीत होता. चांगली बातमी ऐकवल्यामुळे त्याने माझ्याकडून ट्रिट देखील मागीतली होती. पण तेव्हा माझ्याकडे फक्त तीन हजार रूपये होते. त्यामुळे सलमानला बाहेर घेवून जाण्यासाठी मला फार लाज वाटत होती. पण आता ते दिवस राहीले नाहीत.' असे वक्तव्य सोनाक्षीने केले आहे. 


सोनाक्षीने तिच्या आयुष्यातील सर्वात कठिण दिवसांच्या आठवणींना यावेळेस उजाळा दिला. तर सोनाक्षी लवकरच 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनाच्या जबाबदारी प्रभूदेवाच्या खांद्यावर आहे.