मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 'नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी' चक्क शनिवारी ट्विट अकाऊंट डिलिट केलं आहे. सोनाक्षीसोबतच आयुष शर्मा, साकिब सलीम, जहीर इकबाल आणि स्नेहा उल्लाल यांनी देखील ट्विट अकाऊंट डिलिट केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्टार किड्सवर टीका करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोनाक्षी सिन्हाने 'दबंग' सिनेमातून आणि स्नेहा उल्लालने 'लकी : नो टाइम फॉर लव' या सिनेमातून अभिनेता सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. (सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिल्यांदाच सोशल मीडियात प्रतिक्रिया)


सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्माने 'लवरात्री' आणि सलमानच्या मित्राचा मुलगा जहीर इकबालने 'नोटबुक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूड अभिनेत्री हुमा खुरेशीचा भाऊ साकिब सलीमने देखील सलमानसोबत 'रेस 3' सिनेमात काम केलं आहे. आता असं वाटतंय की, या कलाकारांनी सलमान खानला पाठिंबा देण्यासाठी ट्विटरला अलविदा केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझम या विषयावर जोरदार चर्चा झाली. या चर्चेनंतर सगळ्यांनी अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक करण जोहरवर जोरदार टीका झाली. 



सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खानला लक्ष्य करणारे नेटकरी आणि सलमानच्या फॅन्समध्ये काही ठिकाणी तूतूमैमै झालेली दिसली. मी माझ्या सर्व फॅन्सना विनंती करतो की सुशांतच्या फॅन्ससोबत उभे राहा. त्यांच्या भावना समजून घ्या. वाईट भाषा वापरु नका. या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबाला सहारा द्या. आपला कोणी निघून जाणं हे खूप वेदनादायी असतं असं ट्वीट सलमानने केलंय.