मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'थप्पड से डर नाही लगता सहाब... प्यारसे लगता हैं...' या एक डायलॉगमुळे सोनाक्षी अनेकांच्या मनाची राणी झाली. 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षीने कधीचं मागे वळून पाहिलं नाही. आज तिचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाक्षीच्या चाहत्यांच्या यादीत फक्त मुलचं नाही, तर मुली देखील आहे. फक्त भारतातचं नाही, तर शेजारील राष्ट्र पाकिस्तानात देखील सोनाक्षीची एक चाहती आहे. सोनाक्षीची ही चाहते हुबेहूब तिच्यासारखीचं दिसते. सोनाक्षीच्या या चाहतीचं नाव अलिश्बा लेघारी असं आहे. 



अलिश्बाला पाहिल्यानंतर, तुम्हाला वाटेल की सोनाक्षीचं पाकिस्तानात आली आहे. पण असं काहीही झालेलं नाही. पाकिस्तानमध्ये हुबेहूब सोनाक्षीसारखी दिसणारी एक मुलगी राहते.


अलिश्बा सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर आहे. अलिश्बा ही भारताच्या शेजारी देश पाकिस्तानची आहे. इंटरनेटच्या दुनियेत तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे.