Sonakshi Sinha Gettiong Married : बॉलिवूड अभिनेता सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ही चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा इंडियन कपिल शोचा भाग झाली होती. त्यावेळी तिनं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा तिच्या लग्नासंबंधीच नवी अपडेट समोर आली आहे. तर सोनाक्षी सिन्हा ही अभिनेता जहीर इकबालला डेट करते. ज्याच्यासोबत ती नेहमी पार्टी आणि कार्यक्रमात दिसते. असं म्हटलं जातं की सोनाक्षी ही जून 23 रोजी मुंबईत लग्न करणार आहे. त्यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्षवेधी गोष्ट म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल हा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. या सगळ्यात जहीरनं सोनाक्षीला बर्थडे विश करत एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात एक रोमॅन्टिक फोटो देखील शेअर केले होते. इंडिया टुडे प्रमाणे, जवळचे मित्र आणि कुटुंबाशिवाय लग्नात हीरामंडीच्या कास्टला आमंत्रण दिलं आहे. असं म्हटलं जातं की लग्नाचं निमंत्रणाला मॅग्झिन कव्हरसारखं डिझाइन करण्यात येतील. ज्यात असं लिहिलं आहे की अफवा सत्यात उतरल्या. पाहुण्यांना फॉर्मल कपडे परिधान करून येण्यास सांगितलं आहे. तर लग्नाचा कार्यक्रम हा बॅस्टियनमध्ये करण्यात येईल. दरम्यान, अजून सोनाक्षी किंवा जहीरकडून कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. 



दरम्यान, असं म्हटलं जातं की भेट झाल्यानंतर ते एकमेकांचे चांगले मित्र झाले. हळू हळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरनं एकत्र म्यूजिक एल्बममध्ये काम केलं. त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चांमध्ये सोनाक्षीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा त्यांनी सांगितलं की तिच्या पार्टनरमध्ये कोणत्या गोष्टी हव्या आहेत. सोनाक्षीनं सांगितलं होतं की 'तिचा पार्टनर हा खरं बोलणारा असावा. म्हणजेच तो स्वत: सोबत ऑनेस्ट असावा, त्यासोबत पार्टनरसोबतही. जेव्हा तुम्ही भांडाल तेव्हा देखील तुमता पार्टनर तुमच्यासोबत असायला हवा. तर यात एका वेगळ्याच प्रकारचं कम्फर्ट असतं.'


हेही वाचा : अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणं ते गोळी झाडण्यापर्यंत; वादात अडकले होते नंदमुरी बालकृष्ण


सोनाक्षीनं पुढे सांगितलं की ती खूप रोमॅन्टिक व्यक्ती आहे. ती अशा पार्टनरच्या शोधात आहे, जो तिला तसंच राहू देईल, जशी ती आता आहे. तिला त्याच्यासोबत फ्री आणि लिबरल फील करायचं आहे. जर तिच्याकडून काही चूक झाली तर तिच्या पार्टनरनं तिला याविषयी सांगावं आणि त्यात सुधारणा करावी.