मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे सध्याचे काही सिनेमे फारशी कमाल करु शकले नाहीत. सिनेमे थंड पडल्यामुळे की काय सोनाक्षी मात्र हॉट झाली आहे. तिच्या या हॉटनेसमुळेच ती सोशल मीडियावर चांगलची ट्रोल होत आहे. सोनाक्षीने एक फोटो शेअर केल्याने नेटकरी चांगलेच संतापले आहेत. ट्रोलर्सने भारतीय संस्कृती आणि सभ्यतेची सोनाक्षी आठवण करुन दिली.


नवा हॉट अवतार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाक्षीने इंस्‍टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यात तिने लाल रंगाचा पारदर्शक गाऊन घातला आहे. तिची पूर्वीची इमेज मनात असल्याने सोनाक्षीचा हा नवा हॉट अंदाज युजर्संना भावला नाही. त्यामुळेच त्यांनी आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. नकली सोना अशी कमेंट करत युजर्सने सोनाक्षीला ट्रोल केले. तर काही चाहत्यांना सोनाक्षीचा हा नवा अंदाज भावला आणि त्यांनी सोनाक्षीचे खूप स्तूती केली.



यापूर्वीही ट्रोलिंगला बळी


सोशल मीडियावर ट्रोल होण्याची सोनाक्षीची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही बॉलिवूडचे अनेक कलाकार ट्रोलिंगला बळी पडले आहेत. दीपिका पदुकोण, फातिमा सना शेख, कतरिना कैफ, ईशा गुप्ता यांसारख्या अभिनेत्रींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. मात्र सेलिब्रेटी याकडे दुर्लक्ष करतात. 


सोनाक्षीच्या या सिनेमांना थंड प्रतिसाद


सोनाक्षी वेलकम टू न्यूयॉर्क या सिनेमात झळकली होती पण हा सिनेमा फारसा कमाल करु शकला नाही. गेल्यावर्षी सिद्धार्थ मल्होत्रा सोबत आलेला इत्तेफाकही फ्लॉप ठरला.