मुंबई :  सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलिकडेच अभिनेत्री फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये सोनाक्षी सिन्हा ब्रायडल लूकमध्ये दिसत आहे. या फोटोनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. ती म्हणजे सोनाक्षी सिन्हा लग्नबंधनात अडकल्याची. या फोटोंमध्ये सोनाक्षीचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले. सोनाक्षीचा मेकअपही खूप आकर्षक आहे. सोनाक्षी सिन्हा लाल लेहेंगामध्ये खूप सुंदर दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबत तिने मॅचिंग ज्वेलरी घातली आहे. सोनाक्षीने तिचा एक क्लोजअप फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीचे डोळे पाहून, आपण तिच्यापासून आपले डोळे काढू शकणार नाही. जरी हे फोटो लग्नाच्या ड्रेसमधील असतील तरी हे एक फोटोशूट आहे. 


याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सतत होत असलेल्या ट्रोलिंगचा सामना कलाकारांना करावा लागत आहे. ही गोष्ट आता ट्रोलिंग पर्यंत मर्यादीत राहिली नसून सेलिब्रिटींना जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या देखील धमक्या येत आहेत. त्यामुळे अभिनेत्री सोनाक्षी  सिन्हाने या विरोधात एक मोहीम सुरू केली आहे. ‘अब बस..’ असं या मोहिमेचं  नाव आहे. 



सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि नकारात्मकतेपासून लांब राहण्यासाठी सोनाक्षीने तिचा ट्विटर अकाऊंट बंद केलं. त्यानंतर आता तिने ट्रोलिंगविरोधात मोहिम सुरू करण्याचा निर्धार केला आहे. सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती भुज द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात दिसली होती.