मुंबई : सोनाक्षी सिन्हा आता आपल्या या बोल्ड फोटोमुळे ट्रोल झाली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या ट्रान्सपरंट गाऊनमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. वास्तविक सोनाक्षीला यापूर्वीही ट्रोल केले आहे. मात्र तिने नेहमीच ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळेस त्याचे झाले असे की, सोनाक्षीने तिचा लाल रंगाच्या गाउनमधील एक फोटो शेअर केले. हा फोटो शेअर करतानाच तिने स्पष्ट केले की, हा फोटो जुलैमधील आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. परंतु युजर्सला तिचा हा फोटो अजिबातच पसंत आला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही युझर्सने तिला चीप असं संबोधलं आहे. तर एका युझर्सने तिच्या फोटोवर कमेंट करत विचारलं की तुमचे संस्कार कुठे गेले?  एका दुसऱ्या युझर्सने असं म्हटलं आहे की, तू या फोटोत खूप घाणेरडी दिसत आहेस. तर तिसऱ्या युझर्सने म्हटलं की तू हे घातलेले कपडे देखील का नाही काढलेस असा प्रश्न नेटीझन्सने विचारले आहेत.



रेस 3 मध्ये दिसणार सोनाक्षी 


सोनाक्षी लवकरच आपल्या आगामी सिनेमांत रेस 3 मध्ये कॅमिओ करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमांत सोनाक्षी अभिनेता साकिब सलीमच्या लेडी लवचा रोल प्ले करणार आहे. रेस 3 हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सोनाक्षी सिन्हासोबतच या सिनेमांत सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शहा असणार आहे.