Sonalee Kulkarni Pregnancy News :  मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी. (sonalee kulkarni pregnancy ) आपल्या सौंदर्याने, डान्सने लाखो हृदयावर अधिराज्य गाजवणारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज मराठी कलाविश्वात एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. अप्रतिम अभिनयाने  सोनालीने अगदी कमी कालावधीत सिनेसृष्टीत आपलं नाव कोरलं. मराठीसोबत सोनाली बॉलिवूडमध्येही काही सिनेमांमध्ये दिसली होती.


 अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दुबईस्थित कुणाल बेडेकर या मराठमोळ्या तरुणासोबत लग्न केलं. लॉकडाऊनमध्ये रजिस्टर मॅरेज केल्यानंतर , गेल्याच वर्षी सोनाली कुलकर्णीने सर्व कुटुंबीय आणि मित्रांच्या


उपस्थितीत लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्नाचा पुन्हा एकदा बार उडवला. तिच्या लग्नाचं प्रक्षेपण प्लॅनेट मराठीवर या OTT (Planet Marathi OTT) वाहिनीवर सुद्धा दाखवण्यात आलं होत. लग्नानंतर


सोनालीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला होता. यानंतर चाहते सोनालीला गुड न्यूज कधी देणार म्हणून प्रश्न विचारू लागले होते. यावर आता सोनालीने मौन सोडलं आहे. सोनालीचा एक व्हिडीओ


सध्या खूपच चर्चेत आहे. ज्यात ती कोणालातरी फोनवर, गुड न्यूज आहे असं सांगताना दिसलीये. त्यामुळे आता सोनालीच्या घरातही पाळणा हलणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. ही गुडन्यूज


म्हणजे नेमकी कसली गोड बातमी आहे ?  हे आता लवकरच समजणार आहे. 


त्याचं झालं असं की...


प्लॅनेट मराठीच्या एका टॉकशोमध्ये शो होस्टने सोनालीला गुड न्यूज आहे का असं विचारल्यावर सोनाली भलतीच लाजली. यावरून तरी नक्कीच सोनालीच्या मनात काहीतरी चालू आहे असा अंदाज आता प्रेक्षक लावत आहेत.  


गाढवाचं लग्न या मराठी सिनेमातून सोनाली कुलकर्णीने अप्सरेचा रोल साकारत मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. या नंतर बकुळा नामदेव घोटाळे, क्षणभर विश्रांती, आबा झिंदाबाद, हाय काय नाय काय, मितवा, तमाशा, क्लासमेट सारख्या दर्जेदार सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाचा दर्जा दाखवून दिलाय.  


अप्सरा आली लावणीने दिली ओळख 



नटरंग (Natrang marathi movie ) सिनेमाने खरं पाहता मराठी सिनेसृष्टीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. याच सिनेमातील अप्सरा आली (apsara aali song) हे गाणं आणि या गाण्यातून समोर आलेली सोनाली कुलकर्णीला सगळ्या महाराष्टाने डोक्यावर घेतलं. या गाण्याने सोनाली कुलकर्णीला खऱ्या अर्थाने वेगळी ओळख निर्माण करून दिली होती.