फोटोज : कॅन्सरग्रस्त सोनालीला मिळतेय फ्रेंड्सची साथ
न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. किमोथेरपी घेत असलेल्या सोनालीची प्रकृती सध्या स्थिर आहे. आपल्या प्रकृतीचे अपडेट्स सोनाली सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत असते.
तिच्या या कठीण प्रसंगात तिचे कुटुंबिय तिच्यासोबत आहेतच. पण त्याचबरोबर तिच्या खास मैत्रिणीही तिला आधार देत आहेत. दिया मिर्जा, सुजेन खान आणि गायत्री ओबेरॉय या तिच्या मैत्रिणी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्याचबरोबर सोनालीला अधिकाधिक आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत.
फ्रेंडशिप डे निमित्त सोनालीने आपल्या या मैत्रिणींचे आभार मानले होते. त्यांच्यासाठी तिने खास पोस्टही केली होती.
आता सुजेन खानने आपल्या या मैत्रिणीसोबतचा फोटो शेअर करुन भावूक पोस्ट केली. यावरुनच यांचे बॉन्डींग किती जबरदस्त आहे, हे दिसून येते.