सोनाली बेंद्रेनं घातला 16 वर्ष जुना ड्रेस..मात्र फरक फक्त `इतकाच`
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज तिचे जुने फोटो शेअर करत असते. सोनाली अलीकडेच पती गोल्डी बहलसोबत साकिब सलीम आणि हुमा कुरेशीच्या ईद पार्टीला गेली होती.
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज तिचे जुने फोटो शेअर करत असते. सोनाली अलीकडेच पती गोल्डी बहलसोबत साकिब सलीम आणि हुमा कुरेशीच्या ईद पार्टीला गेली होती.
ईद पार्टीत सोनालीने तिचा 16 वर्ष जुना ड्रेस परिधान केला होता. सोनालीने याच ड्रेसमधील जुना आणि नवीन फोटो शेअर केला आहे. सोनाली 16 वर्षांनंतरही या सलवार सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.
सोनालीने 16 वर्षांपूर्वीचा पहिला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका कार्यक्रमात जेम्स बाँडसोबत उभी दिसत आहे. सोनालीने अबू जानी आणि संदीप खोसला यांचा पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करण्यासोबतच तिने ती त्यावेळी प्रेग्नंट असल्याचे सांगितले आहे.
सोनाली बेंद्रेने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ती पती गोल्डी बहलसोबत दिसत आहे. हा फोटो नुकत्याच झालेल्या ईद पार्टीचा आहे.दोन्ही फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
फोटो शेअर करताना सोनालीने लिहिले - जुने आणि नवीन फोटो माझे आवडते आहेत. मी किती बदलले आहे आणि काही गोष्टी बदलल्या नाहीत हे यावरून दिसून येते. मी माझ्या जुन्या पोशाखात फिट दिसते. हा पोशाख 16 वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या तिमाहीत परिधान केला होता आणि आता मी 2022 मध्ये त्याच पोशाखात दिसत आहे. मला फार आनंद वाटतो की फार काही बदललं नाही.
सोनालीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहे. सोनाली बेंद्रे डान्स रियालिटी शो 'डीआयडी लिटल मास्टर'ला जज करत आहे. त्याच्यासोबत या शो ला रेमो डिसूझा आणि मौनी रॉयही जज करत आहेत.