Bold Scene In Web Series : कोणताही कलाकार असो तो त्याचे सीन्स चांगल्या प्रकारे देण्यासाठी चांगलीच मेहनत करत असतो. बऱ्याचवेळा तर कलाकार त्यांचे सीन्स देण्यात इतके मग्न होतात की दिग्दर्शक कट म्हटल्यानंतरही ते थांबत नाहीत. नुकतंच लव्ह लाईफ आणि स्क्रू अप्स या वेब सीरिजच्या सेटवर असंच काहीसं घडलं आहे. या वेब सीरिजच्या सेटवर शूटिंग सुरु असताना इंटिमेट सीनचे (Intimate Scene) शूटिंग सुरु होते. हा इंटिमेट सीन सोनाली राऊत (Sonali Raut) आणि युवराज पाराशर (Yuvraj Parashar) यांच्यात सुरु होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली राऊत आणि युवराज पाराशर यांच्यात झालेला हा सीन शूट करण्याआधी सोनाली आणि युवराज हे अस्वस्थ झाले होते कारण त्यांना हा सीन शॉवरच्या खाली द्यायचा होता. यावेळी सोनाली आणि युवराज या दोघांनी सीरिजचे दिग्दर्शक कौस्तुभ शर्माला (Director Kaustubh Sharma)  विनंती केली की एका शॉटमध्ये हा सीन शूट करा. ते सुद्धा कोणत्याही प्रकारची रिहर्सल न करता. यावर दिग्दर्शक कौस्तुभनं सहमती दाखवली आणि जो पर्यंत कट म्हणत नाही तोपर्यंत दोघांनीही अभिनय सुरु ठेवण्यास सांगितले. (Sonali Raut And Yuvraj Parashar Got Conscious Before Shooting) 


हेही वाचा : ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे Arijit Singh Live Concert बेरंग, चाहत्यांसाठी वाईट बातमी!


कौस्तुभ यांनी कॅमेरा सुरु करताच शॉवर सुरु झाला आणि सोनाली आणि युवराज हे सीन देऊ लागले. सोनाली आणि युवराज या सीनमध्ये इतके मग्न झाले हे पाहताच दिग्दर्शक कौस्तुभ यांनी कॅमेरा सुरु ठेवला कारण त्यांना हवे तेवढे फुटेज मिळत होते. जेव्हा दिग्दर्शकाला वाटले की आपल्याला पुरेसे फुटेज मिळाले आहे, तेव्हा त्यांनी कट म्हटलं. मात्र, सोनाली आणि युवराजला ते ऐकायला गेलं नाही. त्यामुळे दिग्दर्शक कौस्तुभनं कानात जाऊन त्या दोघांना कट असं सांगितलं. तेव्हा सोनाली आणि युवराज यांना धक्का बसला की नक्की काय करत होतो हे कळलंच नाही. दरम्यान, ही वेब सीरिज पुढच्या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.(Sonali Raut and Yuvraj Parashar Lost Their Control During Intimate Scene) 


दरम्यान, या वेब सीरिजमधून अभिनेत्री झीनम अमानही (Zeenat Aman) ओटीटीवर (OTT) पदार्पण करणार आहेत तेही बऱ्याच काळानंतर. तर या वेब सीरिजमधील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालीविषयी बोलायचे झाले तर तिला 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी मिळाली आहे.