मुंबई : Koffee With Karan चा उल्लेखही झाला, तरी आता या कार्यक्रमातून नेमका कोणता खुलासा होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली असते. निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या सूत्रसंचालनाचा तडका असणाऱ्या या टॉक शोचं यंदाचं पर्व जरा जास्तच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामागचं कारण नवं नसलं तरीही होणारे गौप्यस्फोट मात्र बरेच नवे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच Koffee With Karan चा एक नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भागात अभिनेता अर्जुन कपूर त्याची बहीण अभिनेत्री सोनम कपूरसोबत (Sonam Kapoor Arjun Kapoor)उपस्थित राहिला होता. 


सेलिब्रिटी भावाबहिणीच्या या जोडीनं करणसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. गरोदरपणामुळं कलाजगतापासून दूर असणारी सोनम बऱ्याच काळानंतर अशा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होत होती, अर्थात तिच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यामध्ये याचा उत्साह दिसत होता. 


अर्जुनही या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आला आणि त्यानं बऱ्याच मुद्द्यांवर खुलेपणानं वक्तव्य केलं. सोनम आणि अर्जुन भावंड असण्यासोबतच ते एकमेकांचे खास मित्रही आहेत. त्यामुळं एकमेकांचे बरेच Secrets त्या दोघांनाही ठाऊक आहेत. 


आघाडीच्या Bollywood अभिनेत्रीचं स्वयंवर; विजय देवरकोंडा, कार्तिक आर्यनचाही सहभाग? 


असंच एक गुपित सोनमनं ओघाओघात सर्वांसमोर आणलं आणि तू कशी बहीण आहेस... असं म्हणत अर्जुन त्यावर व्यक्त झाला. (Sonam Kapoor Arjun kapoor Koffee with karan 7 viral video on actors personal life )


"How many friends of yours has he slept with?" अर्थात तुझ्या किती मैत्रिणींसोबत अर्जुननं जवळीक साधलीये? असा प्रश्न करणनं तिला केला. या प्रश्नाचं उत्तर देत सोनमनं तिच्या सर्वच भावांना उद्देशून एक असं वक्तव्य केलं की, अर्जुनलाही धक्काच बसला. 


'मी यावर आणखी चर्चाच करणार नाहीये, कारण माझ्या भावांमधलं कोणीच उरलं नाहीये... ', असंच थेट उत्तर तिनं दिलं. सोनमचं उत्तर ऐकून, कसे भाऊ आहेत तुझे...? असं करण (Karan Johar) उपरोधिकपणे म्हणाला.



तितक्यातच तू कशी बहीण आहे गं... आमच्याबद्दल कसं बोलतेयस? अशी प्रतिक्रिया अर्जुननं दिली. अर्थात सोनमच्या या वक्यव्यानंतर त्या तिघांमध्येही एकच हशा पिकला. हा एपिसोड सध्या प्रचंड  गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे.