सोनम कपूर `याने` त्रस्त; तिचं सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन
सोनमकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या शरीरामध्ये आयोडीनची कमी असल्याचं सांगितलं. शाहाकारी असलेल्या सोनमने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली. सोनमने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने, सर्व शाहाकारी चाहत्यांना जेवणात आयोडीनयुक्त मीठाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये, 'सर्व शाहकारी आणि वेगन लोकांसाठी सूचना...ज्या मीठात आयोडीनची मात्रा असेल त्याच मीठाचा जेवणात वापर करा. मला माझ्या शरीरात आयोडीनची कमी असल्याचं समजलंय. टेबल सॉल्ट आयोडीन मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय असल्याचंही' तिने तिच्या स्टोरीमध्ये म्हटलंय.
सोनम सध्या तिच्या आगामी 'द जोया फॅक्टर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
याआधी सोनम 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात अनिल कपूर आणि सोनमने पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली होती.