Sonam Kapoor Spotted Video : अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)  सध्या आपल्या चिमुकल्यासोबत मातृत्वाचा आनंद घेत आहे. अनेकदा अभिनेत्रीने मुलगा वायूसोबत फोटो देखील शेअर केला. दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. आता मात्र अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोनमने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, सोनम कपूर यावेळी विमानतळावर ब्लॅक लूकमध्ये दिसली. यासोबतच सोनम कपूरला पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सोनमला घेरलं. सोनम कपूरचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (sonam kapoor baby shower)



प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूरच्या या स्टायलिश स्टाईलची सर्वजण चर्चा करत आहेत. सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनमनं नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला आहे.(Sonam Kapoor Gave Birth To A Boy) सोनमनं तिच्या मुलाचं नाव वायु-कपूर आहूजा (Vayu Kapoor Ahuja) असं ठेवलं आहे. सोनमनं एक पोस्ट शेअर करत तिच्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे. 


सोनम कपूरने 20 ऑगस्ट रोजी मुलगा वायुला जन्म दिला. सोनमने मुलाचा फोटो शेअर केला आहे मात्र अद्याप चेहरा उघड केलेला नाही. सोनम बर्‍याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, मात्र ती लवकरच पडद्यावर परतणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (sonam kapoor baby pictures)