मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम आणि आनंद आहुजा लवकरच आई-वडील होणार आहेत. हे दोघं त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. काल आनंदचा वाढदिवस होता. त्या निमित्तानं सोनमनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत पती आनंद अहुजाला यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तर सोनमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनमनं आनंद आहुजाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत, 'माझा पती, तुम्ही निःस्वार्थपणे समर्पित आणि खूप दयाळू आहेस. प्रेम मिळवण्यासाठी मी आयुष्यात काहीतरी खूप चांगलं कामं केल असेल. तुझी तुलना कधी कोणासोबत होऊ शकतं नाही आणि भविष्यातही होणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू सगळ्यात चांगला वडील होणार. आय लव्ह यू', असं कॅप्शन तिनं दिलं आहे.  सोनमचं ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 



सोनम आणि आनंदनं २०१८ मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला ४ वर्ष झाले आहेत. सोनमनं मार्चमध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लंडनमध्ये सोनमच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष हे म्यूजिशियन लियो कल्याणने वेधले होते.


सोनमच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सोनमने तिच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमात म्यूजिशियन लियो कल्याणने हजेरी लावली होती. लियो कल्याणला त्याच्या लूकमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. 
दरम्यान, सोनम सगळ्यात शेवटी एके वर्सेस एके या चित्रपटात दिसली होती. त्या आधी सोनम जोया फॅक्टरमध्ये दिसली होती. सोनमने सांवरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर याशिवाय सोनम ‘दिल्ली-6’, ‘खूबसूरत’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘रांझणा’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे.