मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहूजा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आनंद यांच्यावर चोरीचा आरोप असल्याची बातमी येत आहे. एका शिपिंग कंपनीनं आनंद आहुजावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आनंद आहुजानं टॅक्स आणि कस्टम ड्यूटी वाचवण्यासाठी कथित स्वरुपात कागदपत्रांमध्ये बदल केले आहेत असं या कंपनीचं म्हणणं आहे. 



आहुजाने 27 जानेवारी रोजी ट्विट केलं होतं की, 'कोणी आंतरराष्ट्रीय माययूएस कंपनीच्या संपर्कात आहे का? कारण आम्हाला यांच्यासोबत भयंकर अनुभव आला आहे. ही कंपनी चुकीच्या पद्धतीनं सामान जप्त करत आहे आणि औपचारिक कागदपत्रांच्या कारवाईला नकार देत आहे.’ 


आनंदच्या ट्विटनंतर कंपनीने त्याला सोशल मीडियावर काही मर्यादा असल्यामुळे चॅट किंवा इमेलद्वारे संपर्क करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर आहुजाच्या ट्विटला कंपनीने उत्तर दिलं. 



'कंपनीच्या सेवांमध्ये नाही तर आनंद आहुजाने दिलेल्या कागदपत्रांमध्ये घोळ आहे.' असं कंपनीने ट्विटमध्ये म्हटलं आहे. कंपनीने दावा केला आहे की आनंदने सामानासोबत टॅक्स म्हणून दिलेली रक्कम ही 90 टक्के कमी आहे. 


सध्या कंपनी आणि आनंदचे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. टॅक्स आणि कस्टम ड्यूटी वाचवण्यासाठी कथित स्वरुपात कागदपत्रांमध्ये बदल केले आहेत असं कंपनीचं म्हणणं आहे. 



पुढे आहुजाने आणखी एक ट्विट केलं आहे, 'आता मी माझं सामान काढून घेतलं आहे आणि माझं अकाउंट बंद केलं आहे...' चोरीच्या आरोपांमुळे सोशल मीडियावर आहुजा चर्चेत आहे.