मुंबई : सोनम कपूरला बॉलिवूडची फ़ॅशन क्वीन समजली जाते. अवघ्या काही दिवसांपूर्वी सोनम कपूर आणि आनंद अहुजा लग्नबंधनात अडकले आहेत. मात्र लग्नानंतर आनंद आणि सोनम दोघांनीही कान्सला हजेरी लावली आहे. लग्नानंतर सोनम कपूर  कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या स्टाईलमध्ये येणार? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर सोनम कपूरनेच तिच्या चाह्त्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.  


 पोल्का डॉट्समध्ये सोनम कपूर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 सोनम कपूरने पोल्का डॉट्समधील खास गाऊन कान्समध्ये परिधान केलेला आहे. सध्या आणि सिंपल लूलमध्येही सोनम कपूर अत्यंत देखणी आणि स्टाईलिश दिसत आहे. 


 




 
 आनंद अहुजाच्या शुभेच्छा  


 आनंद अहुजाने आज इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सोनमला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 2011 पासून सोनम कपूर सलग 7 वर्ष कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावत आहे. 8 मे रोजी लग्नबंधनात अडकलेली सोनम कपूर कोणत्या अंदाजात दिसणार याबाबत खूप उत्सुकता होती. 



 
 यंदा ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, हुमा कुरेशी, कंगना रणावतनंतर सोनम कपूर ही भारतीय अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर अवतरली आहे.