Amitabh Bachchanच्या फॅन Alka Yagnikने जे गाणं मजेमध्ये केलं होतं रेकॉर्ड, ते कसं बनलं 80च्या दशकातील सुपरहिट गाणं
अलका याग्निकला माहिती सुद्धा नव्हतं की तिचं `हे` ऑडिशनसाठी गायलेलं गाणं सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सिनेमामध्ये येणार आहे
मुंबई : 80च्या दशकातील सुपरहिट गाणं ''मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है' संबंधित आम्ही तुम्हाला एक मजेदार किस्सा सांगणार आहोत हे गाणं अलका याज्ञिक यांनी गंमती-गमतीत ऑडिशनच्या निमित्तानं रेकॉर्ड केलं होतं. होय, अलका याग्निकला माहिती सुद्धा नव्हतं की तिचं हे ऑडिशनसाठी गायलेलं गाणं सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सिनेमामध्ये येणार आहे. चला तर मग जाणून घेवुयात याची कथा
अलका याज्ञिकने 1981 मध्ये अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांचा सिनेमा 'लावारिस' मधील 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है' या गाण्याला आवाज दिला होता अलका याज्ञिक इंडियन आयडल 12मध्ये गाण्याच्या बाबतीतला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला आहे. कल्याणजी-आनंदजी स्पेशल एपिसोड मध्ये अलका ने सांगितले की कल्याणजी आणि आनंदजी तिला भरपूर चिडवायचे कारण, कि त्या बुद्धू टाइप होत्या.
कायमच कोणत्या पण गोष्टींवर विश्वास ठेवायच्या. ती म्हणाली, ''मी अमिताभ बच्चनचा मोठी चाहती आहे. मी आनंदजी-कल्याणजी यांना सांगितलं की मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत भेट घडवून द्या. त्यांच्यासोबत ओळख करून द्या. त्यावर ते म्हणाले 'लावारिस 'चित्रपटासाठी अमिताभजी 'मेरे अंगने में गाणं' रेकॉर्डिंग करत आहेत. तु सुद्धा या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये या...
अलका पुढे म्हणतात जेव्हा, अमिताभ यांनी गाणं रेकॉर्ड केलं होतं. आनंद जी मला म्हणाले की, चला तुमची ऑडिशन घेऊया तुमचा आवाज माईक वर कसा वाटतो हे तपासू त्यांनी मला हे पूर्ण गाणं एक-दोनदा गायला लावलं आणि बाहेर येण्यास सांगितलं. मी बाहेर आले यानंतर आनंदजीने सांगितलं की तुम्हाला माहिती आहे.
हे गाणं तुम्ही ऑडिशनसाठी रेकॉर्ड केलं होतं ते गाणं लावारिस सिनेमामध्ये आपण पाहूया. मला असं वाटलं की हे दोघे मिळून माझी थट्टा करत आहेत मी हसून म्हणालो ठीक आहे. तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत सिनेमात हेच गाणं ठेवलं गेलं या चित्रपटाचं संगीत कल्याणजी-आनंदजी या जोडीने दिलं होतं. हे गाणं बनवून यामागील ही खास कहाणी आहे.