मुंबई : सध्या देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. बॉलिवूडमध्ये देखील कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अभिनेता रणबीर कपूर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टला देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आलियाला कोरोना झाल्यामुळे तिची आई सोनी राजदान यांनी भीती व्यक्त केली आहे. आता मला भीती वाटत आहे.. असं त्या म्हणाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक कविता लिहिली आहे. 'ही काही सामान्य लाट नाही.. ही सर्वत्र आहे..आपल्या घरात..आपल्या केसात..आता मला भीती वाटत आहे..ही सामान्य लाट नाही..ही लाट सर्वत्र आहे..माहिती नाही कसं वाचू..आपण कसं स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो..'



असं म्हणतं राजदान यांनी कोरोना व्हायरस बद्दल भीती व्यक्त केली आहे. त्यांची ही कविता सध्या तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं  झालं तर, आलिया सध्या 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. सिनेमाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी काही दिवसांपूर्वी कोरोना ग्रस्त झाले होते. 


भन्साळी यांच्या संपर्कात आल्यानंतर आलियाने स्वतःला क्वारंटाईन केलं होतं. पण तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आलिया शिवाय बॉलिवूडमध्ये अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाली. अभिनेता विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, रोहित शेट्टी, मलायका आरोरा, अर्जुन कपूर हे देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले होते.