मुंबई : 'मुड़ के ना देखो दिलबरो...' तो दिवस अखेर अभिनेत्री आलिया भट्टच्या आयुष्यात आलाचं.  मिस भट्ट्... आज  मिसेस कपूर झाली... दोन दिवस मोठ्या थाटात आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचं लग्न झालं. आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी मुलीची पाठवणी केली. 'राझी' सिनेमात सोनी यांनी पहिल्यांदा आलियाची पाठवणी केली.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता रियल लाईफमध्ये लेकीला नवरीच्या रुपात पाहून अभिनेत्रीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. सध्या सोनी राजदान यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी दिसत आहे. 



गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा रंगत होती. अखेर दोघांचं लग्न झालं. चाहत्यांचा अनेक दिवसांपासून एकचं प्रश्न होता, तो म्हणजे आलिया आणि रणबीरचं कधी लग्न होणार?


अखेर आज तो दिवस आला. आलिया-रणबीरच्या लग्नासाठी खास बंदोबस्त करण्यात आला आहे. आलिया नवरीच्या रुपात कशी दिसते? तिला नवरीच्या रुपात सर्वांना पाहायचं आहे. पण अद्याप आलिाया आणि रणबीरचा एकही फोटो समोर आलेला नाही. 


पण घरातल्या मंडळींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे.