मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना महामारीच्या संकटादरम्यान हजारो लोकांना खूप मदत करताना दिसला होता. सध्या कोरोनाचा वेग मंदावला आहे पण कलाकार अजूनही लोकांना मदत करण्यात मागे नाहीत. आजही तो लोकांना सर्वतोपरी मदत करण्यास सदैव तत्पर असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेला व्हिडिओ सोनू सूदच्या घराबाहेरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये लोक लांबच लांब रांगेत दिसत आहेत. प्रत्येकजण आपापल्या समस्यांसह मोठ्या अपेक्षेने अभिनेत्यापर्यंत पोहोचला. सोनू सूदने ही अतिशय सभ्यपणे सर्वांचे ऐकूण घेतले. त्याचवेळी एक लहान मुलगी आपली समस्या सांगताना भावूक झाली, त्यानंतर सोनूने तिच्या डोक्यावर हात ठेवून मदतीचे आश्वासन दिले..


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


सोनूचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते त्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओवर एका व्यक्तीने 'तूच खरा हिरो' अशी कमेंट केली आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने त्याला देव म्हटले. 


दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'सर तुम्ही ग्रेट आहात.' याशिवाय बहुतेक लोक या पोस्टवर हार्ट इमोजी बनवून सोनूवर आपले प्रेम खर्च करत आहेत.