मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोनूने कोरोना काळात हजारो लोकांना मदत केली. सोनू हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, यावेळी नेटकऱ्यांनी सोनूला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


आणखी वाचा : पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर पहिल्यांदा राज कुंद्राचा चेहरा समोर, ट्रोलर्स म्हणाले, 'अरे फेस शील्ड...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनूनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनू मुंबईच्या लोकलनं प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला सोनू हा बोईसर रेल्वे स्टेशनवर झोपल्याचे दिसत आहे. रेल्वेच्या आवाजनं तो उठतो आणि ट्रेन पकडतो. व्हिडिओमध्ये सोनूनं रेल्वेमधील पूर्ण प्रवास शेअर केला आहे. जिथे तो सामान्य मुंबईकरासारखा रेल्वेच्या दरवाज्यात उभा आहे, स्टेशनवर असणाऱ्या नळातून पाणी पित आहे. पाणी पिल्यानंतर सोनू बोलतो, बॉस, हे जे पाणी आहे ना, या पाण्याला जगातलं कोणतंही बिसलरी किंवा मिनलर पाणी टक्कर देऊ शकत नाही. सगळ्यात सुपरहेल्दी. रात्री १० वाजता चित्रीकरण संपवून घरी जातानाचा हा व्हिडीओ आहे. (Sonu Sood Travel In Mumbai Local Train Compare Station Water To Mineral Water Troll) 


आणखी वाचा : 'लग्नाच्या काही महिन्यांनंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम 'प्रिन्सची' फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोनूनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी सोनूची स्तुती करत म्हणाला,  ‘सोनूचे पाय अजूनही जमिनीवर आहेत.’ दुसरीकडे त्याला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला,' म्हणजे काही पण...' तिसरा नेटकरी म्हणाला, ' पण सर सामान्य माणसासाठी अनेक अडचणी आहेत.'