सोनू सुदला मुंबई महापालिकेने बजावलं; त्यानं असं काय केलं?
कोणत्या कारणामुळे महापालिकेने बजावलं सोनूला?
मुंबई : अभिनेता सोनू सूदच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण होताणा दिसत आहे. सोनूने नियमांची पायमल्ली करत रहिवासी इमारतीच रूपांतर हॉटेलमध्ये केल्याचा आरोप पालिकेने केला होता. 15 दिवसांत हॉटेलचे रूपांतर रहिवाशी इमारतीत करा, अशी मुंबई महापालिकेने सोनू सुदला सूचना दिली आहे. कोरोना काळात अभिनेता सोनू सुदने जुहूमधल्या त्याच्या इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केलं होतं. ही इमारत 6 मजली आहे.
पालिकेने सोनू सुदला एक पत्र दिलं होतं त्यातील सूचनांनुसार आपण हॉटेलचं रूपांतर रहिवासी इमारतीत करू असं सोनू सुदने पालिकेला कळवल आहे. सोनू सुदने हॉटेलचे रूपांतर रहिवाशी इमारतीत करण्याचं मान्य केलं. मात्र, पुढील १५ दिवसांत हे रुपांतर झालं नाही तर महापालिकेला कारवाई करावी लागेल, अशी सूचना पालिकेने सोनूला दिली आहे.
महापालिकेने सोनूविरोधात 4 जानेवारी रोजी जुहू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. बीएससीने पाठवलेल्या नेटीसीकडे सोनूने दुर्क्षल केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे.