मुंबई : बॉलिवूडमधील दोन कलाकार अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री कंगना रानावत दोन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. पण आता पहिल्यांदाच या दोघांच्या नावाची एकत्र चर्चा होत आहे. कंगना रानावतच्या 'मणिकर्णिका' सिनेमात सोनू सूद देखील काम करत होता. मात्र काही कारणामुळे सोनू सूदने हा सिनेमा सोडला. यावर वेगवेगळे मत सगळ्यांसमोर आली. त्या सिनेमातील सोनू सूदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू सूदला महिला दिग्दर्शिकेच्या हाताखाली काम करणं जमलं नाही. त्याचा पुरूषी अहंकार दुखावला गेला, अशी टीका स्वतः कंगना रानावतने केली होती. मात्र याबाबत बोलताना सोनू सूद म्हणाला होता की, मणिकर्णिका सिनेमाच्यावेळी सिम्बा सिनेमाचं शुटिंग देखील सुरू होतं. दोन्ही सिनेमात सोनूचा लूक वेगळा होता. यामुळे त्याला ते सांभाळणं कठिण होत होतं. त्यामुळे एका वेळी एकच सिनेमा करायचा असा निर्णय घेतल्याच सांगत सोनू सूदने कंगनाचे आरोप फेटाळले आहेत. 



अशातच आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे दोघांच्या नावाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच आता कंगनाने सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर जो पवित्रा घेतला आहे. त्यावर देखील काही दिवसांपूर्वी सोनू सूदने टीका केली होती. सोनू म्हणाला होता की, सुशांतच्या आत्महत्येनंतर एक मोठा वर्ग याचा फायदा उचलत आहेत. जे सुशांत असताना कधी त्याला भेटले नाहीत ते आता त्याच्या मृत्यूचा फायदा उचलत आहेत.