मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात आता बॉलिवूड कलाकारही पुढे येत आहेत. जामियानगरमध्ये सीएएविरोधात रॅली सुरु होण्याआधी गोळीबाराची धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी समोर आली होती. दरम्यान शाहीनबागमध्ये शनिवारी पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. या वादावर आता अभिनेत्री  सोनम कपूरने देखील आपले मत मांडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'आपल्या भारतात असं काही घडेल याची कल्पना देखील मी केली नव्हती. फूट पाडणारे हे धोकादायक राजकारण थांबवा. ही घटना द्वेषाला चालना देत आहे. जर तुम्हाला हिंदू धर्मावर विश्वास आहे तर समजून घ्या की धर्म आणि कर्म एक आहे.' अशा आशयाचं ट्विट करत तिने आपले मत मांडले आहे.


३० जानेवारी रोजी झालेल्या गोळीबारापुर्वी तरुणाने फेसबुकवर स्टेटस टाकलं होतं. एका स्टेटसमध्ये त्याने 'आजादी दे रहा हूं' असं लिहिलं, तर दुसऱ्या स्टेटसमध्ये त्याने 'मी इकडे एकमेव हिंदू आहे, माझ्या घराची काळजी घ्या. शाहीन बाग खेल खत्म,' असं लिहिलं. 'माझ्या अंतयात्रेत मला भगवी वस्त्र परिधान करा आणि जय श्रीरामच्या घोषणा द्या', असं स्टेटसही आरोपीने टाकलं होतं.


गोळीबार करणारा हा हल्लेखोर अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आधार कार्डवर असलेल्या माहितीनुसार तो १७ वर्षांचा आहे. हल्लेखोर गौतम बुद्ध नगर (नोएडा)च्या जेवरमधल्या घोडीवाला भागात राहतो. गोपालच्या वडिलांचं पानाचं दुकान असल्याचंही सांगितलं जात आहे.