Sophie turner filed Case Against Joe Jonas : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) सासरी काही गोष्टी बिनसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे प्रियांका चोप्राची जाऊ म्हणजे सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या नात्यात पडलेली घटस्फोटाची ठिकगी. जो जोनसनं काही दिवसांपूर्वीच आपल्यापासून वेगळं राहणाऱ्या पत्नी सोफी टर्नर हिच्यासोबतच्या घटस्फोटाची जाहीर माहिती दिली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. सोफी आणि जो या दोघांच्याही वैवाहिक नात्यात गोष्टी बिनसल्याची अनेक वृत्त याआधी पाहायला मिळाली. अखेर 6 डिसेंबरला या दोघांनीही या वृत्तांना दुजोरा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हे घटस्फोट प्रकरण आणखी चिघळलं असून, आता सोफीनं Ex Husband विरोधात थेट न्यायालयात खटला दाखल केला असून मुलींचा ताबा परत मिळण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री सोफी टर्नरनं मॅनहॅटन कोर्टात खटला दाखल केला असून, आपल्या मुलींना इंग्लंडला परत पाठवण्याची विचारणार केली आहे. 'मुलींच्या वडिलांनी त्यांना इंग्लंडमध्ये येण्यापासून रोखलं आहे. ब्रिटीश कायद्यानुसार हे एका आईच्या संरक्षणात्मक हक्कांचं उल्लंघन आहे. इंग्लंडच मुलींचं निवासस्थान आहे', असं तिनं दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये म्हटलं गेलं आहे.


हेसुद्धा वाचा :एकदोन नव्हे, कैक कोटी रुपये; MotoGP रायडर्सचा पगार ऐकून दिवसा चांदणं दिसेल


 


सोफी तिच्या आगामि चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होती, त्यामुळं या दोघांनी मिळून मुली जो जोनससोबत राहतील जेणेकरून त्याच्याकडे असणारा वेळ तो मुलींना देऊ शकेल असं म्हटलं गेलं. पण, मुलींसाठी केलेल्या या सोयीसाठी सोफी पूर्णपणे सहमत नसल्याची बाब आता समोर येत आहे.


जो जोनस मुलींचे पासपोर्ट देणार नाही...


मुलींना इंग्लंडना पाठवण्यासंबंधी जो आणि सोफी 17 सप्टेंबर 2023 ला पुन्हा भेटले होते. पण, सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी जो नं स्पष्ट नकार देत मुलींचे पासपोर्टही परत केले नाहीत. परिणामी सध्या वडिलांसोबतच मुलींचे पासपोर्ट आहेत. त्यामुळं या मुलींना इंग्लंडमध्ये जाताही येत नसल्याचं स्पष्ट होत आहे.


'पीपल'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार मुलींच्या शिक्षणासाठी जो आणि सोफीनं जॉईंटली इंग्लंड येथेच कायमस्वरुपी घर घेतलं होतं. सोफीच्या दाव्यानुसार 15 ऑगस्ट 2023 च्या वादानंतर त्यांच्याच तडकाफडकी घटस्फोट झाला होता. पण, जो नं घटस्फोटासाठी केलेल्या अर्जानंतर या दोघांमध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरु असणारे मतभेद उघड झाले होते.