Sourav Ganguly Biopic Updates : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची (Sourav Ganguly Biopic) मोठी चलती आहे. त्यातल्या त्यात क्रिकेटर्सच्या आयुष्यावर अनेक बायोपिक तयार होतं आहेत. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या बायोपिकच्या प्रचंड यशानंतर आत्ता अनेक क्रिकेटर्सच्या आयुष्यावर आधारित बयोपिक येत आहेत. त्यामध्ये कपिल देव (Kapil Dev), मिताली राज यांच्यासह आता क्रिकेटर सौरभ गांगुलीचासुद्धा (Saurabh Ganguly) समावेश झाला आहे. लवकरच दादाच्या आयुष्यावर बायोपिक येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या (Saurabh Ganguly) बायोपिकची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. हृतिक रोशनपासून (Hrithik Roshan) ते सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत (Siddharth Malhotra) या बायोपिकसाठी नाव समोर आले होते. मात्र आता अभिनेता रणबीर कपूरच्या (Sourav Ganguly Biopic) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.


रणबीर कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब!


सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरचे (Sourav Ganguly Biopic) नाव फायनल करण्यात आले आहे. त्याचवेळी त्याचे शूट देखील लवकरच सुरू होईल. बायोपिकचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी रणबीर कोलकात्याला जाणार असल्याचेही म्हटले आहे. जिथे तो ईडन गार्डन, सीएबी ऑफिस आणि दादाच्या (Sourav Ganguly) घरालाही भेट देईल. त्यानंतरच तो शूटिंगला सुरुवात करेल. मात्र अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


वाचा: "घरातला फ्रिज पाहिलाय का?," Muslim व्यक्तीशी लग्न केल्यानंतर स्वरा भास्करला करुन दिली Shraddha ची आठवण


या चित्रपटात धोनीचीही भूमिका असणार?


एमएस धोनीच्या चाहत्यांना सौरव गांगुलीच्या बायोपिकचा आनंद लुटता येणार आहे. कारण धोनीची भूमिकाही त्यात असणार आहे. मात्र ही व्यक्तिरेखा कोण साकारणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही गोष्ट चाहत्यांना नक्कीच उत्तेजित करणार आहे. रणबीर कपूर व्यतिरिक्त, चित्रपटाची उर्वरित स्टारकास्ट अद्याप निश्चित झालेली नाही. 'तू झुठी मैं मक्कर'च्या प्रमोशनमधून मुक्त झाल्यानंतर रणबीर या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


सौरवच्या वैयक्तिक आयुष्यावर बायोपिक


सौरव गांगुली कर्णधार म्हणून खूप यशस्वी होता, त्यासोबतच तो फलंदाज म्हणूनही खूप यशस्वी होता. सौरव गांगुलीने आपल्या कारकिर्दीत 18 हजारांहून अधिक धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 तके आणि 107 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात त्याची फलंदाजीची सरासरी 41+ आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 132 विकेट्सही घेतल्या आहेत.