मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये लेडी सुपरस्टार अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री नयनतारा हिनं काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक- निर्माता विग्नेश शिवन याच्याशी लग्नगाठ बांधली. अतिशय देखण्या अशा विवाहसोहळ्या ही जोडी विवाहबद्ध झाली आणि सेलिब्रिटी मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. (south Actress Nayanthara husband Vignesh Shivan Honeymoon Photos viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता म्हणे ही प्रेक्षकांची लाडकी जोडी देवदर्शन आणि सर्व भेटीगाठी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या हनिमूनसाठी थायलंडला पोहोचली आहे. सध्या या जोडीचे थायलंडमधील काही फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. 


हनिमूनसाठी गेलं असता एकमेकांसोबतच्या या निवांत क्षणांचा आनंद विग्नेश आणि नयनतारा घेताना दिसत आहेत. त्यांचे हे सुंदर फोटो सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवत आहेत. 



एकमेकांकडे प्रेमानं पाहणारे नयनतारा- विग्नेश आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारं प्रेम पाहता जर प्रेमाला चेहरा असता तर ते असंच दिसलं असतं अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत. 





प्रेमाच्या बळावर उभ्या राहिलेल्या नात्याला नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी लग्न करत सहजीवनाचं नाव दिलं आणि त्यांना या नव्या प्रवासासाठी प्रत्येकानं मनापासून शुभेच्छा दिल्या.