Nayanthara : साउथ अभिनेत्री नयनताराच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक वेळा चढ-उतार बघायला मिळाला आहे. अभिनेत्री नयनताराला तिच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अशातच नयनतारा तिच्या अफेअरमुळे देखील अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नयनताराच्या अभिनयामुळे आणि वाढलेल्या वजनामुळे देखील चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व गोष्टी घडत असतानाच नयनताराने नेटफ्लिक्सवर डॉक्यूमेंट्री सीरीज 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' रिलीज केली आहे. या माहितीपट मालिकेत नयनताराने अनेक कठीण काळातल्या गोष्टींबद्दल सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर नयनताराच्या या मालिकेची खूप चर्चा होत आहे. या माहितीपटात नयनतारा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि चित्रपट कारकिर्दीशी संबंधित अनेक किस्से मनमोकळेपणाने सर्वांसमोर मांडत आहे. या सर्व गोष्टींदरम्यान नयनताराने तिच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात कठीण क्षणही सांगितले आहेत.  


नयनताराने सांगितला सर्वात कठीण प्रसंग


'गजनी' चित्रपटाच्या वेळी नयनताराला सर्वात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. 2005 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात तिने काम केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. तिच्यावर केलेल्या कमेंट्समुळे ती खूप नाराज देखील झाली होती.


अभिनेत्रीला या सर्व कमेंट्स वाचून खूप वाईट वाटले होते. लोक म्हणायचे की ती का अभिनय करत आहे? ती चित्रपटात का आहे? ती किती जाड झाली आहे? तुम्ही हे सर्व नाही म्हणू शकत. तुम्ही अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलू शकता. ते ठीक नाहीये. परंतु, मी जे काही करत होते ते मला दिग्दर्शकांनी सांगितले होते. तसेच जे मी कपडे घातले होते ते देखील मला त्यांनीच परिधान करण्यास सांगितले होते. त्यावेळी मी पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत आले होते. त्यामुळे मी कोणालाच काही बोलू शकत नव्हते. 



बिकिनी सीनमुळे सर्व बदलले


नयनताराने 2007 मध्ये आलेल्या 'बिल्ला' चित्रपटाविषयी देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये तिने बिकिनी परिधान केली होती. हे संपूर्ण ड्रामा माझ्या बिकिनी सीनमुळे झाला होता. जो प्रत्येक व्यक्तीसाठी एक मुद्दा बनला होता. कारण, मी जे काही केलं ते काहीतरी सिद्ध करायचे होते म्हणून केलं. त्यासोबतच दिग्दर्शकाने मला सांगितले म्हणून मी तो सीन केला. हे सर्व आवश्यक आहे म्हणून मी ते केलं होतं. मला वाटते की ते माझ्यासाठी देखील कार्य करते.