Actresses pregnant : अभिनेत्रींनी आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून चाहत्यांना दिल्यानंतर चाहते सेलिब्रिटींवर शुभेच्छांचा वर्षाव करतात. पण एकसाथ अनेक अभिनेत्रींनी प्रेग्नेंसी किटचा फोटो पोस्ट केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. साउथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री नित्या मेनन, पार्वती तिरुवोथू यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. अनेक अभिनेत्रींनी चाहत्यांसोबत एकसाथ 'गुडन्यूज' शेअर केल्यामुळे ते गोंधळात आहेत.  (Actresses pregnant)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक अभिनेत्रींनी फोटो पोस्ट केल्यामुळे चाहते त्यांना अनेक प्रश्न विचारत आहे. अनेक जण अभिनेत्रींना खरंच प्रेग्नेंट आहात, की  आगामी सिनेमाचं प्रमोशन आहे? सध्या अभिनेत्रींच फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (fans confused)



अभिनेत्री पार्वतीने इनस्टाग्रामवर प्रेग्नेंसी किटचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये So. .. The wonder begins असं लिहिलं आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऐरवी पार्वती स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल काहीही सांगत नाही. पण आता व्हायरल होत असलेल्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 



फक्त पार्वतीनेच नाही तर, अभिनेत्री अमृता सुभाषने देखील प्रेग्नेंसी किटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे अनेक चाहत्यांनी तिला देखील प्रश्न विचारले आहेत. 


काय आहे व्हायरल फोटोंमागील रहस्य
पद्मप्रिया, अर्चना पद्मिनी, सायनूरा फिलिप आणि अमृता सुभाष या अभिनेत्रींनी प्रेग्नेंसी किटचे (pregnancy kit) फोटो पोस्ट केल्यानंतर, अखेरीस हे उघड झाले की सोशल मीडिया पोस्ट अंजली मेनन दिग्दर्शित आगामी मल्याळम सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोस्ट करण्यात आली होती.


सिनेमाच्या टीमने सूचित केल्याप्रमाणे, या कथेमध्ये गर्भवती महिलांच्या जीवनाचा मागोवा घेतला जाईल. 'वंडर वुमन' नावाचा हा सिनेमा केरळमधील कोझिकोड येथे चित्रित करण्यात आला असून अनेक गर्भवती महिलांच्या (Pregnant women life) जीवनावर आधारित आहे.