Mohanlal's Son Pranav Works in Farm In Spain : लोकप्रिय मल्याळम अभिनेता मोहनलाल यांचा मुलगा प्रणव मोहनलाल हा स्पेन असतो. स्पेनमध्ये तो एका शेतात काम करतो. याविषयी त्याची आई सुचित्रानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे ते त्यांच्या आयुष्याला संतुलित करण्याचा प्रयत्न करतात. त्याशिवाय मुलाविषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका युट्यूब चॅनलला सुचित्रा यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा अप्पू अर्थात प्रणव मोहनलालनं काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तो सध्या स्पेनमध्ये काही वेळ घालवतोय. त्यानं पुढे सांगितलं की 'अप्पू विना पैसे घेत काम करत आहे. त्याच्या बदल्यात त्याला जेवण आणि राहण्यासाठी जागा मिळते. अप्पू सध्या स्पेनमध्ये एका शेतात किंवा दुसऱ्या कोणत्या ठिकाणी काम करत आहे. कधी-कधी, कामात घोड्यांचा सांभाळ करायचा असतो. हा एक अनुभव आहे. जेव्हा केव्हा तो त्याची यात्रा करून परत येतो. त्यानंतर सगळ्या गोष्टी सांगायला सुरु करतो.' 



सुचित्रा यांनी सांगितलं की 'त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुलानं वर्षभरात दोन चित्रपट केले. पण त्यानं देखील स्वत: प्लानिंग केली. प्रणव थोड्या वेगळ्या पद्धतीनं विचार करतो आणि दोन वर्षात एक चित्रपट करून तो आनंदी आहे. त्या म्हणाल्या, मला स्क्रिप्ट ऐकायला खूप आवडतं, त्यामुळे मी आरामात शांत बसून ऐकते. तो दर दोन वर्षात एक चित्रपट करतो. मी त्याला दरवर्षी दोन चित्रपट तरी कस असं सांगत असते. पण जेव्हा मी त्याचा विचार करते तेव्हा मला वाटतं की तो प्रत्येक गोष्टीला बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करतो.'



हेही वाचा : 'भारतात मुस्लिम धोक्यात नाही, सगळं काही...'; विक्रांत मैसीच्या विधानाची सर्वत्र चर्चा! म्हणाला, 'मागील 10 वर्षात...'



प्रणवनं 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओन्नामन' आणि 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुनरजानी' चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट 'पापनासम' मध्ये असिस्टंट डायरेक्टरच्या रुपात काम केलं आहे. हा चित्रपट त्याचे वडील मोहनलाल यांच्या 'दृश्यम' या चित्रपटाचा रीमेक आहे. त्याशिवाय त्यानं 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आधी' मध्ये आणि 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हृदयम' मधून एक नवी ओळख निर्माण केली. तर सगळ्यात शेवटी तो 'वर्षांगलक्कु शेषम' या मल्याळम चित्रपटात तो दिसला होता.