मुंबई : ‘बाहुबली’तील देवसेना अनुष्का शेट्टी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण मुळातच साऊथ सिनेमांमधील अभिनेत्री त्यांच्या हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतात. यातील अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फायसं यश मिळालं नाही. मात्र साऊथ सिने इंडस्ट्रीत त्यांची चांगलीच चलती आहे. अशाच काही स्टार अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दलही माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 


* अनुष्का शेट्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अनुष्का शेट्टीने तिच्या करिअरची सुरूवात 2005 मध्ये ‘सुपर’ या सिनेमापासून केली होती. अनुष्काने माऊंट कार्मल कॉलेज, बेंगळुरू येथून कॉम्प्यूटर अ‍ॅप्लिकेशनमधून ग्रॅज्यूएट केलंय.


* काजल अग्रवाल



31 वर्षीय काजल अग्रवालने साऊथ सिनेमांमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. तिने ‘स्पेशल 26’ आणि ‘सिंघम’ मध्ये काम केलं. त्याआधी तिने ‘मगधीरा’, ‘थुप्पाकी’ आणि ‘चन्दामामा’ सारख्या गाजलेल्या सिनेमातही काम केलंय. काजलच्या शिक्षणाबाबत सांगायचं तर काजलने मुंबईतील केसी कॉलेजमधून मास मीडियातून ग्रॅज्यूएट केलंय.


* नयनतारा



अभिनेता-दिग्दर्शक प्रभूदेवासोबतच्या अफेअरमुळे नयनतारा चांगलीच चर्चेत आली होती. मात्र त्यांच्या आता वाद झाले असून ते वेगळे झाले आहेत. 32 वर्षीय नयनतारानेही साऊथच्या अनेक गाजलेल्या सिनेमात काम केल आहे. तिच्या शिक्षणाबाबत सांगायचं तर ती मरथोमा कॉलेज, तिरूवल्ला येथून इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्यूएट आहे.


* तृषा कृष्णन



साऊथमधील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तृषा कॄष्णन. तृषाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. तिने बॉलिवूडच्या ‘खट्टा मीठा’ या सिनेमात काम केलं होतं. तॄषाने चेन्नईच्या एथिराज कॉलेज फॉर वुमनमधून बीबीए केलंय.


* श्रिया सरन



श्रिया सरनने बॉलिवूडच्या ‘मिशन इस्तांबुल’ आणि ‘दृश्यम’ या सिनेमात काम केलंय. तर साऊथच्या ‘संतोषम’, ‘टॅगोर’, ‘शिवाजी द बॉस’, ‘कंदस्वामी’सोबत आणखीही सिनेमात केलंय. श्रियाने दिलीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून लिटरेचरमधून बीए केलंय.