२९ वर्षीय अभिनेत्रीचा अचानक मृत्यू, चाहते शोक सागरात
अभिनेत्रीच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का
मुंबई : मनोरंजन जगतातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाहत्यांना या बातमीने मोठा धक्का बसला. २९ वर्षीय अभिनेत्रीचा अचानक मृत्यू झाला आहे. ज्यानंतर ही बातमी अगदी वाऱ्याप्रमाणे पसरली आहे.
अचानक झाला मृत्यू
डिस्नी प्लस सिरीज स्नोड्रॉपची स्टार किम मी-सू हिचे वयाच्या २९ व्या वर्षी अचानक निधन झाले. ही माहिती अभिनेत्रीच्या एजंटने दिली आहे. शोमध्ये येओ जंग-मिनची भूमिका करणारी अभिनेत्री 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'मेमरीज' आणि 'क्यूंगमी की दुनिया' मधील तिच्या पात्रासाठी ओळखली जाते. आता ती दुसर्या शोमध्ये दिसणार होती. पण आता तिचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे कारण अज्ञात
मृत्यूचे कारण अद्याप उघड झाले नाही, परंतु किम मी-सूच्या व्यवस्थापन कंपनीने सांगितले की तिचा अचानक मृत्यू झाला. टीमने लोकांना अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल अफवा पसरवण्यापासून टाळण्यास सांगितले जेणेकरून किमच्या कुटुंबियांना त्रास होणार नाही.
तिच्या एजन्सी लॅनस्केपने एका निवेदनात म्हटले आहे की, किम अचानक 5 जानेवारी रोजी आम्हाला सोडून गेली. कृपया खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवू नका. जेणे करून मृत अभिनेत्रीच्या कुटुंबियांना जास्त त्रास होणार नाही.
साऊथ कोरियात झाला जन्म
किम मि-सूच्या कुटुंबीयांना तिचे अंतिम संस्कार शांतपणे आणि खाजगीरित्या करायचे आहेत. किम यांच्या पार्थिवावर तानेयुंग सुंगसिम फ्युनरल होममध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
किमचा जन्म 1992 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाला होता. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाली आहे. तिच्या कारकिर्दीत तिने लिपस्टिक रिव्होल्यूशन आणि हाय बाय, मामा या चित्रपटातही काम केले. किमची डिस्ने+ नाटक 'किस सिक्स सेन्स'मध्ये अभिनय करण्यासाठी देखील निवड झाली होती, जी अद्याप चित्रित केली जात आहे.