मुंबई : बॉलिवूडने अनेक कालाकारांच्या स्वप्नांना मार्ग दाखवला. अनेकांनी आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलं. बॉलिवूडमध्ये काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. पण फार नशीबवान कलाकारांना अशी संधी मिळते. साऊथ कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. पण एका साऊथ अभिनेत्याचा भलताच रुबाब सर्वांसमोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा साऊथ अभिनेता दुसरा तिसरी कोणी नसून सुपरस्टार महेश बाबू आहे. सध्या महेश बाबू तुफान चर्चेत आला आहे. महेश बाबू आदिवी शेषच्या 'मेजर' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होता, जिथे तो त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलला.



महेशला यावेळ बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर तो म्हणाला, 'मला हिंदी सिनेमांच्या अनेक ऑफर येतात, पण बॉलिवूडला मी परवडणारा नाही, आणि ज्यांना मी परवडणार नाही त्यांच्यासोबत मला काम देखील करायचं नाही.'


तो पुढे म्हणाला, 'मला साऊखमध्ये मिळालेले स्टारडम आणि प्रतिष्ठा खूप मोठी आहे. त्यामुळेच मी माझा  इंडस्ट्री सोडून इतर कोणत्याही  इंडस्ट्रीचा भाग बनण्याचा विचार करत नाही. माझे स्वप्न आता पूर्ण होत आहे आणि मी जास्त आनंदी होऊ शकत नाही." असं देखील महेश बाबू म्हणाला.