बॉलिवूड-हॉलिवूड सिनेमांना टक्कर देण्याची ताकद रिजनल सिनेमातच- नार्गाजुन
सैराटने मराठी सिनेमाची ताकद आणि उंची दोन्ही वाढवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मुंबई : सैराटने मराठी सिनेमाची ताकद आणि उंची दोन्ही वाढवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सिनेमाला २ वर्ष उलटली तरी त्याचा प्रयत्य या न त्या कारणाने येत आहे. अलीकडेच झी युवावरील गुलमोहर, फुलपाखरू आणि बापमाणूस सिनेमातील कलाकारांना साऊथ इंडियन सुपरस्टार नागार्जून यांना भेटण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अगदी मराठीतही.
सुपस्टारलाही सैराटची भूरळ
साऊथ इंडियन सुपरस्टार नागार्जून यांनाही या सिमेनाची भूरळ पडली आहे.
सैराटबद्दल नागार्जून भरभरून बोलले. ते म्हणाले की, सैराट मी ४-५ वेळा पाहिला असून मला तो सिनेमा अत्यंत आवडला. मी माझ्या मित्रांकडून सिनेमाबद्दल ऐकले होते. पण पाहिल्यानंतर तो खूपच भावला. हा असा एकमेव रिजनल सिनेमा आहे ज्याने सर्व बॉलिवूड सिनेमांनाही चांगलीच टक्कर दिली. रिजनल सिनेमातच बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांना टक्कर देण्याची ताकद आहे, असेही ते म्हणाले.
संगीतानेही भारावले
म्हणून भाषेची मर्यादा मोडीत काढून नार्गाजून यांनी सैराट बघितला आणि सिनेमाचे संगीतही त्यांना फारच आवडले.
त्यांच्या वागण्यातून दिसले त्यांचे मोठेपण
इतका मोठा कलाकार असूनही दुसऱ्याच्या कलेचे भरभरून कौतुक त्यांनी केले. खरंतर हेच मोठ्या कलाकाराचे लक्षण आहे.