मुंबई : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट जगतामध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर कमल हासन यांनी प्रेक्षवर्ग तयार केला. कमल हसन यांनी राजकारणातही प्रवेश केला. इथं कलाविश्वात त्यांच्या मुली अभिनयाचा वारसा पुढे नेत आहेत. श्रुती आणि अक्षरा हसन अशी त्यांच्या दोन्ही मुलींची नावं. (Kamal Haasan daughter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रुती हसनप्रमाणेच कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसन हीसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटांसमवेत हिंदी चित्रपटांमध्येही झळकली आहे. बऱ्या मोठ्या कलाकारांसह तिनं स्क्रीन शेअर केली आहे. 


चित्रपटांशीच संबंधित कुटुंबात जन्मल्यामुळं अक्षराला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. दिग्दर्शनाच्या क्षेत्रापासून तिनं करिअरची सुरुवात केली. ज्यानंतर अभिनयाच पदार्पण केलं. 


अक्षरा ही तिच्या जीवनात घेतलेल्या काही मोठ्या आणि तितक्याच लक्षवेधी निर्णयांमुळेही कायमच चर्चेत राहिली. यापैकीच एक निर्णय होता, धर्म बदलण्याचा. 2017 मध्ये तिनं जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच मोठा निर्णय घेतला. हिंदू धर्माचा त्याग करत अक्षरानं बौद्ध धर्म स्वीकारला होता. स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्या अक्षराच्या या निर्णयानं सर्वांच्याच नजरा वळल्या. बौद्ध धर्मातील संज्ञा आणि समजुतींवर विश्वास बसल्यानंतरच आपण हे पाऊल उचलल्याचं अक्षरानं स्पष्ट केलं होतं.